मुंबई, दि. 10 जानेवारी 2024 | शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना सर्वोच्च न्यायालयाने पहिली चूक दाखवून दिली होती. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला नसता तर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल वेगळा असता. आता आमदार आणि पक्ष कोणाकडे? हे ठरवताना उद्धव ठाकरे यांना चूक भोवणार आहे. विधानसभा अध्यक्षांकडे ठाकरे गटाने प्रतिज्ञापत्र दाखल केले. परंतु प्रतिज्ञापत्र दाखल केल्यानंतर उलट तपासणीला आले नाही. यामुळे राहुल नार्वेकर यांनी त्यांच्या या चुकीवर बोट ठेवले आणि त्यांचे प्रतिज्ञापत्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी रद्द ठरवले. यामुळे उद्धव ठाकरे यांचे सरकार गेल्यानंतर पक्ष हातातून जाण्याची शक्यता आहे.
शिवसेना उद्धव ठाकरे गटाने प्रतिज्ञापत्र दाखल केले. परंतु उद्धव ठाकरे उलट तपासणीला आले नाहीत. त्यामुळे त्यांचे प्रतिज्ञापत्र अमान्य करण्यात आले आहे. २०१८ ला पक्षांतर्गत निवडणूक झाली नाही. म्हणून ती घटना अमान्य केली जात आहे, ती घटना चूक आहे. २०१८च्या घटनेतील बदल ग्राह्य नाहीत. निवडणूक आयोगाने दिलेलीच घटना वैध आहे, असे राहुल नार्वेकर यांनी म्हटले.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल दिला. निकाल देताना तीन गोष्टी महत्वाच्या ठरल्याचे त्यांनी सांगितले. घटना, नेतृत्व आणि विधिमंडळ बहुमत या गोष्टी पक्ष ठरवताना आधार ठरल्या. पक्ष ठरवताना २०१८ मधील शिवसेना पक्षाची घटना महत्वाची आहे. दोन्ही गटाने वेगवेगळी घटना दिली. उद्धव ठाकरे यांनी पक्षाची जी घटना दिली त्यात तारीखच नाही. यामुळे निवडणूक आयोगाने दिलेल्या घटनेचा मी आधार घेत आहे. ठाकरे गटाने 2018 मध्ये पक्षाच्या घटनेत केलेली दुरुस्ती ही घटनाबाह्य आहे. 2018 मधील घटना चूक आहे. 2023 मध्ये निवडणूक आयोगाने जी घटना दिली ती योग्य आहे. 2018 पक्षाअंतर्गत निवडणूक झालीच नाही. दहाव्या सूचीनुसार फक्त राजकीय नेतृत्व बघायचे आहे. पक्षाचा प्रमुख कोण? मी फक्त हेच ठरवणार आहे. विधीमंडळातील बहुमत हा महत्वाचा मुद्दा आहे.