मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी आपल्या राजकीय निवृत्तीची घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नेत्यांना त्यांच्या निर्णयामुळे धक्का बसला आहे. शरद पवार यांच्या या निर्णयामुळे आमदार जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड आणि इतर नेत्यांनाही अश्रू अनावर झाले होते. ज्या प्रमाणे राष्ट्र्वादी काँग्रेसमधील नेते भावूक झाले होते. त्याच प्रमाणे राष्ट्रवादीच्या मित्र पक्षाकडूनही शरद पवार यांनी आपला निर्णय मागे घ्यावा अशी विनंती करण्यात आली. त्यांच्या या निर्णयानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून राजीनाम्याचे अस्त्र बाहेर काढण्यात आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी शरद पवार हेच पाहिजे असा हट्टही आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी करण्यात आला आहे.
शरद पवार यांनी आपला निर्णय मागे घ्यावा यासाठी आता राष्ट्र्वादी काँग्रेसचे सक्षणा सलगर यांनी थेट विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडे थेट मागणी करत आम्हाला राष्ट्रवादीच्या अध्यक्ष पदी शरद पवारच हवेत अशी मागणीही त्यांनी केली आहे.
शरद पवार यांनी आपला निर्णय जाहीर केला असला तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना त्यांचा हा निर्णय मान्य नसल्याचे सांगत त्यांनी हा निर्णय मागे घ्यावा अशी भावना व्यक्त केली आहे.
शरद पवार पवार यांनी राजकीय निवृत्तीची घोषणा केली असली तरी शरद पवार यांची निवृत्ती आम्हाला मान्य नाही असं स्पष्ट मतही त्यांनी व्यक्त केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष पदावर शरद पवार हेच हवे आहेत. कारण शरद पवार हेच राष्ट्रवादीची आई-बाप असल्याचे सांगत त्यांच्याशिवाय राष्ट्रवादीचा आम्ही विचार करु शकत नाही अशी भावनाही सक्षणा सलगर यांनी व्यक्त केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या अध्यक्ष पदी तेच हवे आहेत अशी मागणी करत आता आम्ही अजित पवार यांच्याकडेही हट्ट करू अशी भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
त्यामुळे सक्षणा सलगरे यांनी सांगितले की ज्या प्रमाणे माझी भावना आहेत तशीच भावना अनेक कार्यकर्त्यांची आहे अशी मागणीही त्यांनी केली आहे.