हुश्श… खूश खबर ! विहार, तानसापाठोपाठ मोडक सागर तलावही ओव्हरफ्लो; मुंबईकरांना मोठा दिलासा

| Updated on: Jul 28, 2023 | 8:50 AM

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांची एकूण कमाल पाणी साठवण क्षमता ही सुमारे 1,44,736.3 कोटी लीटर (14,47,363 दशलक्ष लीटर) इतकी आहे.

हुश्श... खूश खबर ! विहार, तानसापाठोपाठ मोडक सागर तलावही ओव्हरफ्लो; मुंबईकरांना मोठा दिलासा
modak sagar dam
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई | 28 जुलै 2023 : गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि ठाणे परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबई आणि ठाण्यात तर पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. दोन्ही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांना कारण नसताना घराबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. धरण क्षेत्रातही पावसाने चांगलाच जोर धरल्याने अनेक धरणं तुडूंब भरून वाहू लागली आहेत. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या विहार आणि तानसापाठोपाठ मोडक सागर धरण ओसंडून वाहू लागलं आहे. त्यामुळे मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली असून मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी मोडक सागर तलाव काल रात्री 10 वाजून 52 मिनिटांनी ओसंडून वाहू लागला आहे. त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. मोडक सागर धरणाची पाणी पातळी 163.15 टीएचडी एवढी असून हा तलाव पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागला आहे. दरम्यान, मुंबईला पाणी पुरवठा करणारे काही धरणे भरली असली तरी अजूनही इतर धरणे भरणे बाकी आहे. गेल्यावर्षी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये 1277787 दक्षलक्ष लिटर पाणीसाठा होता. आज हा साठा 891274 दशलक्ष लिटर एवढा आहे. मात्र, येत्या काळात पाणी साठ्यात मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हे सुद्धा वाचा

चार तुलाव ओव्हर फ्लो

दरम्यान, आतापर्यंत मुंबईला पाणी पुरवठा करणारे चार तलाव ओसंडून वाहत आहेत. तुळशी तलाव 20 जुलै रोजी मध्यरात्री 1 वाजून 25 मिनिटांनी भरून वाहू लागला होता. तर विहार तलाव 27 जुलै रोजी रात्री 12 वाजून 48 मिनिटांनी वाहू लागला होता. तानसा तलावही 26 जुलै रोजी पहाटे 4 वाजून 35 मिनिटांनी ओसंडून वाहू लागला होता.

तुळशी आणि तानसाही भरून वाहू लागला

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी विहार आणि तानसा हे दोन्ही तलावही भरुन ओसंडून वाहू लागले आहेत. विहार तलाव 26 जुलै रोजी मध्यरात्री 12 वाजून 48 मिनिटांनी, तर तानसा तलावही त्याच दिवशी पहाटे 4 वाजून 35 मिनिटांनी ओसंडून वाहू लागला होता. गेल्याच आठवड्यात तुळशी तलाव ओसंडून वाहू लागल्यानंतर त्यापाठोपाठ तानसा आणि विहार हे दोन्ही तलाव देखील ओसंडून वाहू लागले.

विहार तलावाची कमाल जलधारण क्षमता 2,769.8 कोटी लीटर (27,698 दशलक्ष लीटर) एवढी आहे. हा तलाव वर्ष 2021 मध्ये 18 जुलै रोजी, 2020मध्ये 5 ऑगस्ट रोजी, तर 2019 मध्ये 31 जुलै रोजी तर त्‍या आधीच्‍या वर्षी म्‍हणजेच 2018 मध्‍ये 16 जुलै रोजी ओसंडून वाहू लागला होता. तानसा तलावाची 14,494.6 कोटी लीटर (144,946 दशलक्ष लीटर) एवढी त्याची कमाल जलधारण क्षमता आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांची एकूण कमाल पाणी साठवण क्षमता ही सुमारे 1,44,736.3 कोटी लीटर (14,47,363 दशलक्ष लीटर) इतकी आहे.