मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar ) यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर ( Babasaheb Ambedkar) यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त (Mahaparinirvan Din) दादर येथील चैत्यभूमीवर जाऊन अभिवादन केलं. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, पर्यटन विकास मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं. अजित पवार यांनी यावेळी आपल्याला बाबासाहेबांनी सांगितेलेल्या समता, एकता, बंधुता आणि सर्वधर्मसमभावाच्या विचारावंर देश पुढं न्यावा लागेल, असं म्हटलं. जातींमध्ये तेढ निर्माण होणार नाही याची जबाबदारी सर्वच राजकीय पक्षांनी घ्यावी लागेल, असंही अजित पवार म्हणाले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सर्व प्रथम विनम्र अभिवादन करतो. त्यांनी सांगितलेला विचार समता, एकता बंधुता, सर्वधर्मसमभाव या विचारानीच देश पुढं जाऊ शकतो. हे अनेकदा आपल्या सर्वांच्या पाहण्यात आहे. त्यामुळं या विचारानंचं देशाला पुढं न्यायचं आहे. परंतु, वेगवेगळी संकट येत असतात त्यातून मार्ग काढायचा असतो. आता देखील ओमिक्रॉनचा नवा विषाणू आलेला आहे त्यावर मीडियात चर्चा सुरु आहे. ओमिक्रॉनच्या बद्दल आजचा दिवस कसा पार पाडायचा याची चर्चा झाली. लोकांच्या भावना महत्त्वाच्या असतात.
प्रत्येकांनी नियमांनी पालन करायचं असतं. दरवर्षी राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित राहतात. प्रकृतीच्या कारणामुळं मुख्यमंत्री उपस्थित राहिले नाहीत. राज्यपाल महोदय आणि मंत्रिमंडळातील सहकारी आम्ही येथे येऊन महामानवाला अभिवादन केलं आहे. त्यांच्या विचारावर राज्याला पुढं नेण्याचा प्रयत्न करत आहोत. जातीय सलोखा राहावा, समाजात तेढ निर्माण होणार नाही याची जबाबदारी सर्वच राजकीय पक्षांनी घ्यावी. कधीही कुठल्याही एका घटनेकडं राजकीय भूमिकेतून न पाहता मार्ग निघेल याकडे पाहावं. हे बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला आणि विश्वाला सांगण्याचा प्रयत्न केला, मी त्यांना अभिवादन करतो, असं अजित पवार म्हणाले.
मुख्यमंत्र्यांचं, प्रशासनाचं, मंत्रिमंडळाचं लक्ष आहे. वेगवेगळ्या राज्यात बाहेरुन लोक येतात त्याबद्दल केंद्रानं कडक भूमिका घेतली पाहिजे. नियमांचं पालन अतिशय काटेकोरपणे होतंय की नाही. देशात जिथं आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत तिथं काळजी घ्यावी. दोन वर्षापूर्वी दुबईतून जोडपं आलं त्यांच्यानंतर ड्रायव्हरला कोरोना झाला आणि पसरला, असं अजित पवार म्हणाले.
आताच्या काळात देशातल्या विविध राज्यात एक दोन पाहायला मिळत होते. परंतु जिथं कुटुंबाला लागण झाल्याचंही समोर आलं. देशपातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर जागतिक आरोग्य संघटनेनं भूमिका घ्यावी. लसीचे दोन डोस घेतलेले आहेत त्यांनाही संसर्ग झाला असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळं कोरोना बुस्टर डोसबाबत तातडीनं निर्णय घ्यावास अजित पवार म्हणाले.
काल परवा राजकीय लोकांच्या घरातील लग्न झाली,लोकांनी प्रचंड गर्दी केली होती. आपण यापूर्वी पाच ते सहा फुटांचं अतंर ठेवत होतो. मास्क काढला तरी संसर्ग होत होता. आता ओमिक्रॉनसंदर्भातही देशपातळीवर निर्णय घेण्याची गरज आहे, असं अजित पवार म्हणाले. बुस्टर डोसबद्दल वेगवेगळे मतप्रवाह आहेत. बुस्टर डोस का घ्यायचा नाहीतर का नाही घ्यायचा, हेही सांगावं, असं अजित पवार म्हणाले. लहान मुलांच्या लसीकरणाबद्दल केंद्र सरकार आणि जागतिक आरोग्य संघटनेनं भूमिका स्पष्ट करण्याची गरज आहे, असंही अजित पवार म्हणाले.
इतर बातम्या:
Nagpur | बाबासाहेबांच्या वस्तू टिकणार 100 वर्षे, प्रयोगशाळेत केली जातेय रासायनिक प्रक्रिया
Ajit Pawar said on we should follow the principles of Babasaheb Ambedkar on mahaparinirvan din at Mumbai