Ambani Family : मुकेश अंबानी दुसऱ्यांदा आजोबा बनले, आकाश आणि श्लोका यांना मुलगा झाला की मुलगी?

| Updated on: May 31, 2023 | 8:04 PM

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरी पुन्हा एकदा लहान मुलीचा आवाज घुमला आहे. मुकेश अंबानी आजोबा तर नीता अंबानी आज्जी बनली आहे. अंबानी यांची सून श्लोका हिने आज दुपारी कन्यारत्नाला जन्म दिला आहे.

Ambani Family : मुकेश अंबानी दुसऱ्यांदा आजोबा बनले, आकाश आणि श्लोका यांना मुलगा झाला की मुलगी?
Akash Ambani
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरी पुन्हा एकदा लहान मुलीचा आवाज घुमला आहे. मुकेश अंबानी आजोबा तर नीता अंबानी आज्जी बनली आहे. मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश आणि सून श्लोका मेहता यांना कन्यारत्नाचा लाभ झालाय. आकाश आणि श्लोकाचे हे दुसरं आपत्य आहे. या आधी या दोघांना एक मुलगा आहे. पृथ्वी असं त्याचं नाव आहे. आता पृथ्वीला छोटी बहीण मिळाली आहे.

YouTube video player

मीडिया रिपोर्ट्स नुसार आकाश आणि श्लोकाची मुलगी आज बुधवारी जन्माला आली आहे. काही दिवसांपूर्वीच मुकेश अंबानी आपला मुलगा आकाश आणि नातू पृथ्वी याच्यासोबत सिद्धिविनायकाच्या दर्शनाला आले होते. तर श्लोका ही बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसून आली होती. काही दिवसांपूर्वी नीता अंबानी यांनी एका कल्चरल सेंटरचं उद्घाटन केलं होतं. त्यावेळी सोशल मीडियावर या कार्यक्रमाचे काही फोटोही व्हायरल झाले होते. त्यावेळीही श्लोका मेहता त्या कार्यक्रमात बेबी बंपमध्ये दिसून आल्या होत्या. त्यामुळे श्लोका या आई बनणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आता त्यांनी एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे.

हे सुद्धा वाचा

2019मध्ये विवाह

आकाश आणि श्लोका यांचा विवाह मार्च 2019मध्ये झाला होता. दोघेही लहानपणापासूनचे मित्र आहेत. श्लोका या प्रसिद्ध हिरे व्यापारी रसेल मेहता यांची मुलगी आहेत. 10 डिसेंबर 2020मध्ये अंबानी यांच्या घरी गोंडस पाहुण्याचं आगमन झालं होतं. श्लोका यांना पुत्र रत्नाचा लाभ झाला होता. या मुलाचं नाव पृथ्वी ठेवण्यात आलं होतं. आता आणखी एका सदस्याची अंबानी यांच्या कुटुंबात एन्ट्री झाली आहे. मुकेश अंबानी आणि पृथ्वीचे फोटो सोशल मीडियावर नेहमी व्हायरल होत असतात. या फोटोत आजोबा आणि नातवाची चांगलीच गट्टी जमलेली दिसते.

आनंदाचे क्षण

मुकेश अंबानी सध्या आनंदाचे क्षण उपभोगत आहेत. त्यांचा लहान मुलगा अनंत याचा राधिका मर्चंटशी साखरपुडा झाला आहे. तर मुलगी ईशा अंबानी हिने जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. या मुलांचं नाव कृष्णा आणि आदिया ठेवण्यात आलं आहे. आता आणखी एका पाहुण्याचं घरात आगमन झाल्याने घरात प्रचंड जल्लोष सुरू आहे. आजी आणि आजोबांचा तर आनंद गगनात मावेनासा झाला आहे.