Akshay Shinde Encounter: अक्षय शिंदे एन्काऊंटरचा व्हिडिओ जतन करा, सर्व सीडीआर काढा…कोर्टाचे आदेश

| Updated on: Sep 25, 2024 | 2:44 PM

Akshay Shinde Encounter: अमित कटारनवरे यांनी सांगितले की, घटना घडली तेव्हा काही तासांपूर्वी अक्षय शिंदे याच्या आई वडिलांची त्याची भेट झाली होती. त्याने त्यांच्याकडून पाचशे रुपयांची मागणी केली होती. एन्काऊंटर हा पोलिसांचा बनाव आहे.

Akshay Shinde Encounter: अक्षय शिंदे एन्काऊंटरचा व्हिडिओ जतन करा, सर्व सीडीआर काढा...कोर्टाचे आदेश
Follow us on

बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचे सोमवारी एन्काऊंटर झाले. त्या एन्काऊंटर प्रकरणात अक्षय शिंदे याच्या आई-वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर बुधवारी उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी अक्षय शिंदे याच्या आई-वडिलांचे वकील अमित कटारनवरे यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. तळोजा प्रिजनपासून रुग्णालयापर्यंत सगळे पुरावे जतन करा, अशी मागणी त्यांनी केली.

अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात न्यायालयात काय घडले त्याची माहिती अमित कटारनवरे यांनी दिली. त्यांनी सांगितले की, अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात त्याच्या आई वडिलांचा प्रथम खबरी अहवाल का दाखल केला नाही? एडीआरचा गुन्हा का दाखल केला ? सीआयडीकडे का वर्ग केला? असे प्रश्न न्यायालयाने उपस्थित केले. तळोजा प्रिजनपासून रुग्णालयापर्यंत सगळे पुरावे जतन करा. त्यानंतर या प्रकरणाची सर्व कागदपत्रे सीआयडीकडे पाठवले जाणार आहे, असे सरकारी वकिलांनी सांगितले.

आई-वडिलांकडून पैसे मागवले

अमित कटारनवरे यांनी सांगितले की, घटना घडली तेव्हा काही तासांपूर्वी अक्षय शिंदे याच्या आई वडिलांची त्याची भेट झाली होती. त्याने त्यांच्याकडून पाचशे रुपयांची मागणी केली होती. एन्काऊंटर हा पोलिसांचा बनाव आहे. त्याने पोलिसांच्या तावडीतून सुटण्यासाठी पिस्तूल खेचली, हा बनाव आहे, असे कटारनवरे यांनी म्हटले. या प्रकरणातील घटनाक्रम न पटणारा आहे, असे कोर्टाने म्हटले.

हे सुद्धा वाचा

व्हॅनचा व्हिडियो जतन करावा

बंदूकचा लॉक काढून पोलिसांसमोर फायरिंग करणे इतका तरबेज तो होता का? असा प्रश्न न्यायालयाने विचारल्याचे वकील अमित कटारनवरे यांनी सांगितले. व्हॅनचा व्हिडियो जतन करावा, सगळ्यांचे सीडीआर काढण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. तसेच वार्तालाप कुणाशी झाला त्याची सर्व माहिती जतन करण्याचे आदेश दिले. पुढील सुनावणी ३ ऑक्टोबरला होणार आहे.