मुंबई : कोरोना नियमावलीचे उल्लंघन करुन दिल्लीला गेल्याने बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट हिच्यावर मुंबईत येताच कारवाई होण्याची शक्यता आहे. बॉलिवूड निर्माता करण जोहरच्या घरी एका पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीत आलिया भट्टही सहभागी झाली होती. या पार्टीतील सहभागी झालेल्या 4 बॉलिवूड अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह आल्या होत्या. आलिया भट्टचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह होता. मात्र तिला होम क्वारन्टाईन होण्यास सांगितले होते.
मात्र आलिया भट्टने या नियमावलीला केराची टोपली दाखवली. त्यामुळे होम क्वारन्टाईनचे उल्लंघन केल्याप्रकरणी आलिया भटवर कारवाई होण्याची शक्यता आहे. आलिया आज रात्री चार्टर विमानाने दिल्लीहून मुंबईला परतणार आहे. मुंबईत येताच पालिकेचे आरोग्य विभागाचे अधिकारी आलियावर कारवाई करण्याची शक्यता आहे.
कभी खुशी कभी गम चित्रपटाला 20 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने करण जोहरने घरी एका छोट्याशा पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीमध्ये आलिया भट्ट, करीना कपूर, अमृता अरोरा, महिप कपूर, सीमा खान यांच्यासह अन्य सेलिब्रेटी सहभागी झाले होते. पार्टीनंतर करीना कपूर, सीमा खान, अमृता अरोरा, महिप कपूर या अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह आल्या होत्या. आलिया भट्टची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती. मात्र तिला होम क्वारन्टाईन करण्यात आले होते.
बॉलिवूड दिग्दर्शक आणि खास मित्र आयान मुखर्जीसोबत आलिया दिल्लीला गेली होती. दिल्लीतील प्रसिद्ध साहेब गुरुद्वारमध्ये आलिया आणि आयान दर्शनासाठी गेले होते. यावेळचे फोटोही आलियाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. आयान मुखर्जीचा बहुप्रतिक्षित चित्रपट ब्रम्हास्त्रचे मोशन पोस्टर आज रिलिज करण्यात आले. या पोस्टर रिलिज आधी आयान आणि आलियाने दिल्लीतील गुरुद्वारामध्ये जाऊन दर्शन घेतले. आलिया भट आणि रणबीर कपूर या चित्रपटात मुख्य भूमिकेत असणार आहेत. (Alia Bhatt breaks quarantine rules and leaves for Delhi, action likely on return to Mumbai)
इतर बातम्या
Karan Johar | ‘माझं घर कोरोनाचे हॉटस्पॉट बनले नाहीय…’, ‘कोरोना पार्टी’वर करण जोहरचे स्पष्टीकरण!