केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
महाराष्ट्रातल्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने शड्डू ठोकला आहे. भाजपला लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात पराभवाला सामोरं जावं लागल्यानंतर आगामी विधानसभा निवडणूक ही भाजपसाठी जास्त प्रतिष्ठेची बनली आहे. या निवडणुकीत काहीही करुन आपलं महायुतीचं सरकार यावं यासाठी भाजपकडून प्रचंड प्रयत्न केले जात आहे. विशेष म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीकडे जास्त लक्ष देत आहेत. त्यामुळे अमित शाह वारंवार महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. शाह आजसुद्धा दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यादरम्यान अमित शाह मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत संवाद साधणार आहेत. याच पार्श्वभूमीवर मुंबईत दादरमध्ये भाजपचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात अमित शाह यांनी भाजप कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय-काय काम करावं? याबाबतच्या सूचनांचा थेट लेखाजोखाच मांडला.
अमित शाह यांनी कार्यकर्त्यांना काय-काय सूचना केल्या?
- महाराष्ट्र प्रदेश जी योजना आखेल ती कार्यान्वित करा. मंडल आणि वॉर्ड स्तरावर योजना पोहोचवा. विजय आपलाच असेल.
- १० टक्के मतदान वाढवा. सराकर आपले आहे. त्यामुळे आपल्याविरुद्ध नाराजी असेल. नगरसेवक, आमदार आणि खासदार विरोधात असलेली नाराजी दूर करा. बूथवर आपल्याला १० कार्यकर्ते पाहिजेत. दसऱ्यापासून प्रचार संपेपर्यंत हे कार्यकर्ते त्यांच्या बुथच्या कक्षेत फिरत राहतील
- आपल्या विचारसरणी असलेल्या मतदारांना मतदानासाठी उतरवा. प्रत्येक बूथवर किमान २० लोकांना भाजपचे सदस्य करा. सदस्य करताना मतं मागू नका. सदस्य झाल्यावर त्याला आपसुकच मतदानाचे महत्त्व कळेल
- १० टक्के मतदान वाढवा. सरकार आपले आहे. त्यामुळे आपल्याविरुद्ध नाराजी असेल. नगरसेवक, आमदार आणि खासदार विरोधात असलेली नाराजी दूर करा. बूथवर आपल्याला १० कार्यकर्ते पाहिजेत. दसऱ्यापासून प्रचार संपेपर्यंत हे कार्यकर्ते त्यांच्या बुथच्या कक्षेत फिरत राहतील.
- जे आपले मतदार नाही, त्या कुटुंबांना भाजपचे सदस्य करा. हारतुरे घालून निवडणूक जिंकता येत नाही. मतं वाढली तरच निवडणूक जिंकता येते. त्यासाठी मतं वाढवण्याचा प्रयत्न करा
- घराघरात वाद असतात, तसेच विधानसभेत असतात. त्यामुळे असे १० मतभेद असलेले दूर करा. कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेत्यांमध्ये असलेले मतभेद दूर करा.
- काही कामं कुणालाच करायची नसतात, पण खरा कार्यकर्ता तेच काम करायला घेतो. काम करताना वाद होतोच, पण तो वाद संपवता आला पाहिजे.
- ज्या संघटनेत मतभेद असतात, वेगवेगळ्या दिशेने काम करतात, ती संघटना कधीच यशस्वी होत नाही. आपल्याला सर्वप्रथम निवडणूक पूर्वी हे मतभेद दूर करायचे आहेत