मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे आणि डॉ. संजय बोरुडे यांची कन्या मिताली बोरुडे हे दोघेजण विवाहबद्ध झाले. यांचा विवाहसोहळा लोअर परेल येथील सेंट रेजिस या पंचतारांकित हॉटेलमध्ये पार पडला. यावेळी ठाकरे कुटुंबीयांसह कला, क्रीडा, साहित्य, राजकारण, उद्योग यांसह विविध क्षेत्रातील दिग्गजांनी सोहळ्याला उपस्थित राहून, नव्या जोडप्याला शुभाशीर्वाद दिले. अमित ठाकरेंच्या लग्न सोहळ्यातील पाच EXCLUSIVE फोटो
या लग्नसोहळ्याच्या निमित्ताने ठाकरे कुटुंबीय एकत्र आल्याचे पाहावयास मिळाले. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र जयदेव ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सहकुटुंब अमितच्या लग्नाला हजर होते. त्यामुळे लग्नसोहळ्यात ठाकरे कुटुंबीयांचे राजकारणापलिकडचे सहृदयी नातेही पाहायला मिळाले. किंबहुना, उद्धव ठाकरेंची उपस्थिती सर्वांच्याच चर्चेचा विषय होता.
कुणा-कुणाची उपस्थिती?
कोण आहे मिताली बोरुडे?
मिताली बोरुडे फॅशन डिझायनर आहे. तिने फॅड इंटरनॅशनलमधून आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे. मिताली प्रसिद्ध बेरिएट्रिक सर्जन डॉक्टर संजय बोरुडे यांची मुलगी आहे. तसेच राज ठाकरे यांची कन्या उर्वशी ठाकरे आणि मिताली बोरुडे या चांगल्या मैत्रिणी आहेत. दोघींनी मिळून ‘द रॉक’ हा कपड्यांचा ब्रँड त्यांनी लाँच केला आहे.
अमित आणि मितालीची लव्ह स्टोरी
अमित आणि मितालीची दहा वर्ष जुनी मैत्री आहे. कॉलेजमध्ये असतानाच अमित आणि मिताली एकमेकांच्या प्रेमात पडले. अमित ठाकरे पोद्दार महाविद्यालयात कॉमर्स शाखेत शिकत होते. तर मिताली रुईया महाविद्यालयात कला शाखेत शिकत होती. कॉलेजमध्ये असताना या दोघांची ओळख झाली आणि काही वर्षांनी या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. अमतिने मितालीला प्रपोज केला आणि मितालीनेही त्याला होकार दिला. मिताली आणि उर्वशी या दोघी मैत्रिणी असल्यामुळे कृष्णकुंजवर मितालीचे सारखं येणं जाणं सुरु होतं. मात्र काही दिवसानंतर या दोघांनी आपल्या नात्याबद्दल घरात सांगितले आणि दोघांच्या घरच्यांनीही याला होकार दिला.