देशभरात आजपासून गणेशोत्सव सुरु झाला. वाजत गाजत घराघरात गणरायाचे आगमन झाले. आता आगामी दहा दिवस गणेश भक्तांना भव्य दिव्य देखावे पाहण्यास मिळणार आहे. त्यात पुणे, मुंबई येथील गणपती पाहण्यासाठी देशभरातून भाविक येतात. मुंबईतील लालबागच्या राजा या गणपती मंडळाच्या दर्शनासाठी तासनतास रांगा लागणारा आहेत. अनेक उद्योगपती आणि सेलिब्रेटी या गणरायापुढे येऊन नतमस्तक होतात. नुकतेचे उद्योगपती मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी लालबागच्या राजा गणपती मंडळात आले. त्यांनी 20 किलो सोने असलेला राज मुकुट लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केला. या मुकूटाची किंमत 16 कोटी रुपये सांगितली जात आहे. या मुकुटात हिरे आणि अन्य मौल्यवान धातूंचा वापर करण्यात आला आहे. दरवर्षी अंबानी परिवार लालबागच्या राजासमोर कोट्यवधी रुपये किंमतीचा चढावा चढवतात.
उद्योगपती मुकेश अंबानी यांचा छोटे मुलगा अनंत अंबानी यांचे लालबागच्या राजाशी खूप जुने नाते आहे. अनंत अंबानी दरवर्षी या गणपतीचे दर्शन घेतात आणि मौल्यवान वस्तू अर्पण करतात. ते स्वत: या गणपती मंडळाचे सदस्य आहे. त्यांना या मंडळाचे मानद सदस्य केले गेले आहे. मंडळाची नुकतीच सभा झाली होती. त्यात अनंत अंबानी यांना मानद सदस्य करण्याचा प्रस्ताव मांडला गेला आणि तो मंजूर करण्यात आला.
आजपासून लालबागच्या राजा गणपती मंडळासमोर पुढील दहा दिवस लाखोंची गर्दी असणार आहे. या गणरायवर अनंत अंबानी यांची मोठी आस्था आहे. त्यामुळे ते मनापासून चढवा अर्पण करतात. गणपती मंडळाला शक्य ती सर्व मदत करतात आणि वेळप्रसंगी मार्गदर्शनही करतात. अनंत अंबानी यांची भक्ती आणि सहयोगामुळे अनेक सामाजिक अभियानासाठी शक्ती मिळते.
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना 1934 साली लालबाग भागात झाली. गणेश उत्सव साजरा करण्यासाठी स्थानिक मच्छीमार आणि व्यावसायिकांच्या गटाने या मंडळाची स्थापना केली. हे गणेश मंडळ मुंबईतील सर्वात प्रसिद्ध मंडळ आहे.
हे ही वाचा…
गणेशोत्सवात कधीपासून कधीपर्यंत लाऊडस्पीकर वाजणार, पोलिसांनी दिली माहिती