फडणवीसांच्या आरोपांवर अनिल देशमुखांचं उत्तर; काय म्हणाले देशमुख?

| Updated on: Mar 22, 2021 | 2:26 PM

गृहमंत्री अनिल देशमुख हे 15 फेब्रुवारी रोजी होम आयसोलेशनमध्ये होते असं म्हणता तर मग त्यांनी पत्रकार परिषद कशी घेतली? असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना केला होता. (anil deshmukh denied devendra fadnavis allegations)

फडणवीसांच्या आरोपांवर अनिल देशमुखांचं उत्तर; काय म्हणाले देशमुख?
devendra fadnavis
Follow us on

मुंबई: गृहमंत्री अनिल देशमुख हे 15 फेब्रुवारी रोजी होम आयसोलेशनमध्ये होते असं म्हणता तर मग त्यांनी पत्रकार परिषद कशी घेतली? असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना केला होता. त्यावर अनिल देशमुख यांनी खुलासा केला आहे. त्या दिवशी नेमकं काय घडलं, याचा वृत्तांतच देशमुख यांनी दिला आहे. (anil deshmukh denied devendra fadnavis allegations)

अनिल देशमुख यांनी एका व्हिडीओद्वारे ही मागणी केली आहे. मी नागपूरच्या रुग्णालयात 5 ते 15 फेब्रुवारी दरम्यान अॅडमिट होतो. मला कोरोना झाला होता. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर घरी जात असताना मला काही पत्रकार भेटले. त्यांनी मला सेलिब्रिटजवरील वादावर काही प्रश्न केले. तेव्हा माझ्या अंगात ताप नव्हता. पण अंगात त्राण होता. मला थकवा आलेला होता. त्यामुळे रुग्णालयाच्या गेटवरच पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. त्यानंतर मी थेट गाडीत बसून घरी गेलो आणि होम आयसोलेशनमध्ये गेलो. त्यानंतर २८ फेब्रुवारीला मी सह्याद्री गेस्ट हाऊसला पहिल्यांदा आलो, असं देशमुख यांनी म्हटलं आहे. देशमुख यांनी या खुलाश्यातून विरोधकांच्या विरोधातील हवाच काढून टाकली आहे.

पत्रकार परिषदेत काय म्हटलं?

शेतकरी आंदोलनावर भारतरत्न लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी ट्विट केलं होतं. यावरून देशमुख यांनी चौकशीचे आदेश दिले होते. त्यामुळे गदारोळ उठला होता. म्हणून देशमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या म्हणण्याचा विपर्यास केल्याचं देशमुख यांनी स्पष्ट केलं होतं.

फडणवीसांनी काय केला होता आरोप

देवेंद्र फडणवीस यांनी थेट 15 फेब्रुवारी रोजी अनिल देशमुख यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेचा एक व्हिडीओच ट्विट केला आहे. “देशमुख यांनीच हा व्हिडीओ ट्विट केला होता. 15 ते 27 फेब्रुवारी या कालावधीत अनिल देशमुख होम क्वारंटाईन होते, असे पवार साहेब सांगतात. पण, 15 ला सुरक्षारक्षकांसह, समोर माध्यमप्रतिनिधी अशी पत्रपरिषद मात्र झाली होती. हे नेमके कोण?”, असा सवाल फडणवीस यांनी केला आहे. यातून फडणवीस यांना परमबीर सिंग यांनी केलेला दावा खरा असल्याचं म्हटलं आहे.

काय म्हणाले पवार?

परमबीर सिंग यांनी फेब्रुवारीच्या मध्यात वसुलीच्या सूचना देण्यात आल्याचे सांगितले होते. माझ्याकडे कागदपत्र आहेत. त्यावरून 5 ते 15 फेब्रुवारीपर्यंत अनील देशमुख हे कोरोनामुळे रुग्णालयात भरती होते. मी रुग्णालयातूनही ही माहिती घेतली आहे. देशमुख हॉस्पीटलमध्ये भरती असल्याचा रेकॉर्ड आहे आणि 15 ते 27 फेब्रुवारी पर्यंत होम कॉरेन्टाईन चा सल्ला डॉक्टरांचा होता. असं असताना सिंग कशाच्या आधारावर देशमुखांनी वाझेंना भेटून वसुलीचे आदेश दिल्याचं सिंग सांगत आहेत, असा सवाल शरद पवारांनी केला आहे. (anil deshmukh denied devendra fadnavis allegations)

 

संबंधित बातम्या:

मग हे अनिल देशमुख कोण?; देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांना सवाल

Sharad Pawar | पत्रकारांच्या प्रश्नांवर शरद पवार म्हणाले “इनफ इज इनफ”

अनिल देशमुखांकडे कोणतं गुपित, ज्यामुळे पवारांनी 24 तासांत भूमिका बदलली? भाजप आक्रमक

(anil deshmukh denied devendra fadnavis allegations)