मुंबई : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. गृहमंत्र्यांनी स्वत: ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. अनिल देशमुख गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी राज्यातील विविध भागांच्या दौऱ्यावर होते. त्यांचा नुकताच आता विदर्भ दौरा झाला. या दौऱ्यादरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता आहे. दरम्यान, अनिल देशमुख यांनी संपर्कात आलेल्या सर्वांना कोरोनाची चाचणी करण्याचं आवाहन केलं आहे (Anil Deshmukh tested corona positive).
“आज माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून माझी प्रकृती उत्तम आहे. तरी माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, असे मी आवाहन करतो. लवकरच मी कोरोनावर मात करून पुन्हा आपल्या सेवेसाठी हजर होईल”, असं अनिल देशमुख म्हणाले (Anil Deshmukh tested corona positive).
आज माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून माझी प्रकृती उत्तम आहे. तरी माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, असे मी आवाहन करतो. लवकरच मी कोरोनावर मात करून पुन्हा आपल्या सेवेसाठी हजर होईल.
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) February 5, 2021
गेल्या नऊ महिन्यात पोलीस खात्यातील भरपूर कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. या कठीण काळात राज्याचे गृहमंत्री म्हणून अनिल देशमुख स्वत: विविध ठिकाणी जाऊन पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना धीर देत होते. कोरोना काळात त्यांनी पोलिसांची जबाबादारी खांद्यावर घेतली. आवश्यक तिथे पोलिसांची बाजू घेतली. त्याचबरोबर त्यांनी पोलिसांच्या कामांचं देखील तोंडभरुन कौतुकही केलं. पोलिसांप्रती असणारा अभिमान त्यांच्या बोलण्यातून कायम जाणवतो.
राज्यातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात
राज्यात कोरोना परिस्थितीत हळूहळू नियंत्रणात येत आहे. राज्यात काल (4 जानेवारी) दिवसभरात 2736 नव्या रुग्णांची नोंद झाली तर 5339 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. कोरोनाची परिस्थिती हळूहळू नियंत्रणात येत असल्याने मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी सुरु करण्यात आली आहे.
हेही वाचा : ग्रामपंचायती, पंचायत समिती, जिल्हा परिषदा होणार मालामाल; भरीव निधी देण्याची मुश्रीफांची घोषणा