मुंबई : कथिक मनी लाँड्रिंग प्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर, कार्यालयावर ईडीने छापेमारी केली होती. या छापेमारीनंतर देशमुख कुटुंबीयांची मालमत्ता ईडीने जप्त केली होती. ही मालमत्ता परत करावी ही मागणी करणारी याचिका देशमुख कुटुंबीयांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. ईडीने अनिल देशमुख आणि त्यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख यांच्याविरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली आहे तर ऋषिकेश देशमुखने अटकपूर्व जामिनासाठी सेशन कोर्टात अर्ज केला आहे.
सुरुवातील सुरुवातीला ईडीने अनेक ठिकाणी धाडी टाकल्या होत्या. त्याचप्रमाणे मालमत्ता जप्त केली आहे. अनिल देशमुख यांच्या कुटुंबीयांची पनवेल येथे प्रस्तावित विमानतळा शेजारी जमीन होती. ही जमीन ईडीने जप्त केली आहे. तसेच वरळी येथील फ्लॅटही जप्त केला आहे. ही जमीन आणि फ्लॅट ही मालमत्ता अनिल देशमुख आणि ऋषिकेश देशमुख यांच्या मालकीची नसून ती त्यांच्या कुटुंबातील इतर व्यक्तींच्या मालकीचे आहे. या पार्श्वभूमीवर ही मालमत्ता परत करावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.
ईडीच्या अधिकाऱ्यांनी पाच वेळा अनिल देशमुख यांच्याशी संबंधित ठिकाणी धाडी टाकल्या होत्या. तसेच दोन जणांना अटक केली. गृह विभागाचे सचिव कैलास गायकवाड यांचीही चौकशी करण्यात आली. अनिल देशमुख यांनी ईडी आणि सीबीआयच्या प्रकरणात हायकोर्टात धाव घेतली होती. हायकोर्टाने त्यांची याचिका फेटाळून लावली होती. ते सुप्रीम कोर्टात गेलेत तिथे त्यांची सीबीआय बाबतची याचिका फेटाळण्यात आली. ईडीने अनिल देशमुख याची मालमत्ता जप्त केली आहे. मनी लाँड्रिंगच्या पैशातून ही मालमत्ता केल्याचा ईडीचा आरोप आहे. सुमारे साडे चार कोटी रुपये कुठून आणलेत. बार मालकांच्या पैशातून ही मालमत्ता केली आहे का ? याबाबत अनिल देशमुख यांच्याकडे चौकशी सुरू आहे. (Anil Deshmukh’s family files petition in High Court to return confiscated property)
इतर बातम्या
Breaking : राज्यात ओमिक्रॉनचा शिरकाव, कल्याण-डोंबिवलीत ओमिक्रॉनची लागण झालेला रुग्ण आढळला
Parambir singh : परमबीर सिंह, वाझेविरोधात पहिलं आरोपपत्र दाखल, जबाबात ACP चे मोठे खुलासे