मुंबई : राज्यातील पुणे, मुंबई आणि ठाणे या तीन प्रमुख शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक आहे. या शहरांत होत असलेला ओमिक्रॉन आणि कोरोनाचा प्रसार पहाता तेथील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र राज्यातील इतर भागांमध्ये आजून तशी परिस्थिती नाही. त्यामुळे इतर भागात शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला नसल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. मात्र कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाल्यास भविष्यात शाळा बंद ठेवण्याचा निर्णय होऊ शकतो असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.
पुढे बोलताना टोपे म्हणाले की, काही अनावश्यक गोष्टींमुळे राज्यात कोरोना संसर्ग वाढत आहे. ज्या गोष्टींमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका आहे, त्यावर बंदी आणली जाईल, तसेच वेळोवेळी कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्याचे कम सुरू असून, आवश्यक असल्यास मुख्यमंत्र्यांच्या पातळीवर निर्बंध अधिक कडक करण्यात येऊ शकतात. नागरिकांनी कोरोना नियमांचे काटेकोर पालन करावे. बाहेर पडताना मास्क घालावा. गर्दी टाळावी, घरी आल्यानंतर हात स्वच्छ धुवावेत. कोरोनाची लक्षणे आढल्यास तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधावा असे आवाहन देखील टोपे यांनी यावेळी केले आहे.
दरम्यान राजेश टोपे यांनी नागरिकांना लस घेण्याचे आवाहन देखील यावेळी केले आहे. लसीकरणाशिवाय पर्याय नाही. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला थोपवयाचे असेल तर लस हाच एकमेव पर्याय असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या राज्यात जे कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत, त्यातील अनेकांना लक्षणेच नाहीत. त्यामुळे त्यांना घरीच क्वॉरटांईन करण्यात आले आहे. ज्यांना लक्षणे आहेत, अशा रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सर्व तयारी करण्यात आल्याची माहिती देखील यावेळी टोपे यांनी दिली.
काय सांगता? औरंगाबादेत मेट्रो धावणार… पुढच्या आठवड्यात कोणत्या मंत्र्यांसमोर प्रस्ताव ठेवणार?
Breaking | मुख्यमंत्र्यांबद्दल आक्षेपार्ह लिखाण, भाजपचे माजी नगरसेवक संदीप म्हात्रेला अटक