मुंबईकर श्वास नव्हे सिगारेट ओढतायत? हवेच्या गुणवत्तेची धक्कादायक आकडेवारी समोर

| Updated on: Nov 13, 2023 | 11:55 PM

हवेत किती प्रदूषण आहे हे AQI ने मोजलं जातं. AQI म्हणजे एअर क्वॉलिटि इंडेक्स. अर्थात हवेच्या दर्जाचं प्रमाण. AQI जर 0 ते 50 असेल तर ती हवा चांगल्या श्रेणीत येते. 51 ते 100 असल्यास मध्यम स्वरुपातील, 101 ते 200 असल्यास अपायकारक, 201 ते 300 असेल तर प्रचंड अपायकारक आणि 300 ते 500 च्या दरम्यान असेल तर अशी हवा ही अतिशय घातक असते.

मुंबईकर श्वास नव्हे सिगारेट ओढतायत? हवेच्या गुणवत्तेची धक्कादायक आकडेवारी समोर
mumbai-air-pollution
Image Credit source: socialmedia
Follow us on

मुंबई | 13 नोव्हेंबर 2023 : देशाची राजधानी दिल्ली आणि महाराष्ट्राची राजधानी मुंबई या दोन्ही शहरांमध्ये प्रदुषणाने अक्षरश: टोक गाठलं आहे. कारण दोन्ही शहरांमधील हवा प्रचंड दुषित झालीय. त्यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात येऊ शकतो. हवेची गुणवत्ता सातत्याने ढासळत असल्याने अनेकांकडून चिंता व्यक्त केली जातेय. विशेष म्हणजे सध्या दिवळाची सण सुरु आहे. या दिवाळीच्या सणानिमित्ताने अनेकांना फटाके फोडले. त्याचा मोठा परिणाम मुंबईच्या हवेवर झालाय. आधीच प्रदूषण आणि त्यात फटाक्यांच्या धुरानं मुंबईतल्या अनेक भागात दोन दिवसांपासून भटके कुत्रे आणि पक्षीही गायब झाले आहेत. मुंबईतल्या हवेची गुणवत्ता गेल्या 24 तासात 288 इतकी नोंदवली गेलीय. ही हवा घातक आहे आणि आपण श्वास घेतोय की मग विष ओढतोय? असा प्रश्न निर्माण झालाय.

मुंबईकरांनी कालच्या फक्त 24 तासात 150 कोटी रुपयांच्या फटाक्यांचा धूर केल्याची माहिती समोर आलीय. रात्री मुंबईत सर्वत्र धुराचे लोट होते. आधीच प्रदूषणामुळे दिल्लीची स्थिती बिकट झालेली असताना मुंबईतली AQI म्हणजे हवेची गुणवत्ता 288 इतकी नोंदवली गेली. अशी हवा लहान मुलं- वृद्धांसहीत तरुणांसाठीही घातक असते. हवेत किती प्रदूषण आहे हे AQI ने मोजलं जातं. AQI म्हणजे एअर क्वॉलिटि इंडेक्स. अर्थात हवेच्या दर्जाचं प्रमाण. AQI जर 0 ते 50 असेल तर ती हवा चांगल्या श्रेणीत येते. 51 ते 100 असल्यास मध्यम स्वरुपातील, 101 ते 200 असल्यास अपायकारक, 201 ते 300 असेल तर प्रचंड अपायकारक आणि 300 ते 500 च्या दरम्यान असेल तर अशी हवा ही अतिशय घातक असते.

फटाक्यांच्या धुरामुळे मुंबईतली हवा विषारी

कालच्या आकडेवारीनुसार मुंबईचा AQI 288 म्हणजे प्रचंड अपायकारक या श्रेणीत होता. आणि दिल्लीचं म्हणाल तर तिथला AQI हा 421 पर्यंत गेलाय. म्हणजे तिथली हवा मुंबईहून धोकादायक आहे. नियमाप्रमाणे मुंबईत फटाके फोडण्यासाठी संध्याकाळी 7 ते 10 ही वेळ होती. मात्र मुंबईत काही भागात रात्री 2 पर्यंत फाटके फुटले. मध्यंतरीच्या पावसानं मुंबईची हवा सुधारली होती. मात्र त्यात बांधकामात झालेली वाढ आणि फटाक्यांच्या धुरामुळे मुंबईतली हवा विषारी बनलीय.