VIDEO: एनसीबीने केस मोठी करण्यासाठी अचितकुमारला ड्रग्ज पेडलर ठरवलं, वकिलाचा धक्कादायक दावा; वाचा सविस्तर

| Updated on: Oct 26, 2021 | 7:00 PM

एनसीबीने केस मोठी करण्यासाठीच अचितकुमारला ड्रग्ज पेडलर ठरवलं होतं, असा धक्कादायक दावा अरबाज मर्चंटचे वकील तारक सय्यद यांनी केला आहे. (arbaaz merchant lawyer taraq sayed interact with media)

VIDEO: एनसीबीने केस मोठी करण्यासाठी अचितकुमारला ड्रग्ज पेडलर ठरवलं, वकिलाचा धक्कादायक दावा; वाचा सविस्तर
taraq sayyed
Follow us on

मुंबई: एनसीबीने केस मोठी करण्यासाठीच अचितकुमारला ड्रग्ज पेडलर ठरवलं होतं, असा धक्कादायक दावा अरबाज मर्चंटचे वकील तारक सय्यद यांनी केला आहे. अचितकुमार हा चांगला मुलगा असून आपण त्याला आधीपासून ओळखत आहोत, असा दावाही तारक सय्यद यांनी केला आहे.

आर्यन खान याच्या जामिनावर आज कोर्टात युक्तिवाद करण्यात आला. उद्या या प्रकरणावर पुन्हा सुनावणी होणार आहे. त्यानंतर अरबाज मर्चंटचे वकील तारक सय्यद यांनी मीडियाशी संवाद साधताना कोर्टात झालेल्या युक्तिवादाची माहिती दिली. अचित कुमार हा 17 आरोपी आहे. अचितला घरी जाऊन अटक केल्याचं पंचनाम्यात म्हटलं आहे. पण ते खोटं आहे. एनसीबीने केस मोठी करण्यासाठी अचित कुमारला ड्रग्ज पेडलर ठरवलं. मी अचित कुमारला पर्सनली ओळखतो. मला माहीत आहे तो चांगला मुलगा आहे. परदेशात शिकलेला आहे. सुट्टीत आला होता, असं तारक यांनी सांगितलं.

स्मॉल कॉन्टिटीच्या केसेसमध्ये सीएमएम कोर्टाकडे केस चालवण्याची पॉवर असते. मात्र या केसमध्ये हे प्रकरण सीएमएम कोर्टातून काढून मेन्टेबिलिटीचा इश्यू करण्यात आला. त्यामुळे स्मॉल कॉन्टिटिला कमर्शियल कॉन्टिटीहून आणि इंटरमिटरी कॉन्टिटीशी संलग्न करून सेक्शन 29 शी इनव्होक करून सीएमएम कोर्टाच्या ज्युरिसडिक्शनमधून बाहेर काढलं, असं त्यांनी सांगितलं.

कारण नसताना व्हॉट्सअॅप चॅट घुसडले

यावेळी व्हॉट्सअॅप चॅटबाबतही त्यांना प्रतिक्रिया व्यक्त केली. कारण नसताना व्हॉट्सअॅप चॅट या केसमध्ये टाकल्या आहेत. त्याचं काही जस्टिफिकेशन नाही. ते केवळ फ्रेंडली आहे. ते काही विशेष नाही, असंही त्यांनी सांगितलं.

कटाचा संबंध काय?

युक्तिवादावेळी अमब्रेला कॉन्सपिरन्सीचाही उल्लेख झाला. त्याबाबतही त्यांना विचारण्यात आलं. सर्वांना सेक्शन 29मध्ये घेतलं आहे. एनसीबीच्या स्वत:च्या तपासात त्यांना हा कटाचा भाग होता हे सिद्ध करता आलेलं नाही. तुम्ही हा कट आहे म्हणता तर तुम्हाला ते सिद्ध करता आलं पाहिजे. सर्व इक्विली कनेक्टेड आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. पण यातील अनेकजण एकमेकांच्या संपर्कातच नव्हते तर त्यांचे लागेबांधे कसे म्हणात येईल? असा सवालही त्यांनी केला.

शुक्रवारपर्यंत निर्णय येईल

आज फक्त युक्तिवाद झाले. आज एका बाजून युक्तिवाद झाला आहे. उद्या दुसऱ्या बाजूने युक्तिवाद होणार आहे. युक्तिवाद सुरू असल्याने न्यायाधीशांनी आज काही सांगितलं नाही. उद्या 3 वाजता पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे, असं वकिलांनी सांगितलं. अरबाज मर्चंट आणि आर्यन खान मित्रं असल्याचंही कोर्टाला सांगितल्याचं वकिलांनी सांगितलं. शुक्रवारपर्यंत निकाल येईल. पॉझिटिव्ह निगेटिव्ह जो असेल तो निर्णय येईल, असंही त्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

Aryan Khan Bail | मोठी बातमी ! आर्यन खानच्या जामीनावरची आजची सुनावणी स्थगित, उद्या पुन्हा युक्तीवाद होणार

Aryan Khan Bail Hearing Live | आर्यन खान जामीन अर्जावरील आजची सुनावणी स्थगित, उद्या पुन्हा सुनावणी

क्रुझवर पोहोचण्याआधीच आर्यन खानला अटक, मुकूल रोहतगी यांची कोर्टाला धक्कादायक माहिती; आर्यन प्रकरणात ट्विस्ट?

(arbaaz merchant lawyer taraq sayed interact with media)