मुंबई: आर्यन खानला क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी काल जामीन मिळाला. पण कोर्टाची ऑर्डर मिळाली नाही. त्यामुळे त्याची कालची रात्र तुरुंगात गेली. आज तो कोणत्याही परिस्थितीत तुरुंगाबाहेर येईल असं सांगितलं जात होतं. मात्र, कागदपत्रांची पूर्तता करण्यात वेळ गेल्याने आर्यन खान तुरुंगाबाहेर येऊ शकला नाही. त्यामुळे त्याची आजची रात्र मन्नत ऐवजी तुरुंगातच जाणार आहे. आर्यनच्या सुटकेसाठी आज दिवसभर आर्यनचे वकील आणि किंग खान शाहरुख खानची धावपळ सुरू होती. पण आजही त्यांच्या पदरी निराशा आली. नेमकं आजच्या दिवसात काय घडलं? त्याचा घेतलेला आढावा.
आर्यन खानच्या जामिनाची ऑर्डर कॉपी एनडीपीएस कोर्टातून आर्थर रोड तुरुंगात साडेपाच पर्यंत पोहोचली नाही. त्यामुळे त्याला जामीन मिळूनही आजची रात्र तुरुंगातच काढावी लागणार आहे. आता लिगल टीम आज संध्याकाळी ऑर्डर कॉपी तुरुंग प्रशासनाकडे सादर करणार आहे. त्यानंतर उद्या शनिवारी त्याची सकाळी 11 वाजता सुटका होईल.
जामिनाची ऑर्डर कॉपी 5.35 ते 5.40 वाजेपर्यंत पोहोचली तरच कैद्याची सुटका होते. मात्र, आर्यनची ऑर्डर कॉपी 5.40पर्यंत पोहोचली नाही. त्यामुळे त्याला तुरुंगातच राहावे लागणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रॅफिकमुळे उशीर झाल्याने तुरुंगात ऑर्डरची कॉपी पोहोचू शकली नाही.
आर्यनच्या जामिनासाठी एक लाख रुपयांच्या पर्सनल बाँडची रजिस्ट्री करण्यात आली. शाहरुख खानने पर्सनल बाँडची रक्कम जमा केल्याचं सूत्रांनी सांगितलं.
एनडीपीएस कोर्टाने आर्यनच्या वकिलांना डिटेल ऑर्डर मागितली. त्यावर आर्यनचे वकील सतीश मानेशिंदे यांनी आमच्याकडे ऑपरेटिव्ह ऑर्डर असल्याचं सांगितलं. माझ्याकडे पेपर्स कंप्लीट आहेत. जामीनदार म्हणून जुही चावला आहे.
मानेशिंदे: जुहीचा आधार आणि पासपोर्ट सोबत आहे.
जुही: जुही चावला मेहता
न्यायाधीश: कुणासाठी?
जुही: आर्यन खानसाठी.
मानेशिंदे: सर, जुही आर्यनला लहानपणापासून ओळखते. तसेच ती त्यांच्याशी प्रोफेशनलीही कनेक्टेड आहे.
जज: अॅक्सेप्टेड
मानेशिंदे: धन्यवाद
आर्यनला जामीन मिळाला आहे. त्याला उद्या तुरुंगातून सोडण्यात येईल. आज कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली. आर्यनसाठी अभिनेत्री जुही चावला जामीनदार बनली आहे.
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 29 October 2021 https://t.co/1DwxainjDO #News #Bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 29, 2021
संबंधित बातम्या:
VIDEO: पोर्न रॅकेटशी काहीच घेणंदेणं नाही, काशिफ खानचं नवाब मलिक यांना प्रत्युत्तर
(Aryan Khan bail : Aryan Khan to spend one more night in jail, to be released tomorrow)