मुंबई: मुंबईच्या एनडीपीएस कोर्टाने आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आता त्याच्या वकिलांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. आर्यन खानचे वकील सतीश मानेशिंदे आणि अमित देसाई यांनी जामिनासाठी हायकोर्टात अर्ज दाखल केला आहे. विशेष एनडीपीएस सेशन्स कोर्टाच्या निकालाला आर्यनच्या वकीलांमार्फत हायकोर्टात आव्हान देण्यात आलंय. आर्यन खानच्या वतीनं जामिनासाठी हायकोर्टात अर्ज दाखल करण्यात आलाय. मात्र, न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांच्याकडून आजचं कामकाज बरखास्त करण्यात आल्यानं, आर्यन खानला आजची रात्र तुरुंगात राहावं लागणार आहे.
आर्यन खानच्या वतीनं अॅड.सतीश मानेशिंदे आणि अॅड. अमित देसाई यांनी जामिनासाठी हायकोर्टात अर्ज दाखल करण्यात आलाय. मात्र, न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांनी आजचं कामकाज बरखास्त करण्यात आल्यानं, आर्यन खानला आजची रात्र तुरुंगात राहावं लागणार आहे. उद्या साडेदहानंतर हायकोर्टाचं कामकाज सुरू होणार त्यावेळी सदर प्रकरण न्यायमूर्तीं समोर येण्याची शक्यता आहे.
Breaking: Aryan Khan Moves Bombay High Court Against Special Court Order Denying Bail In Drug Case @CourtUnquote https://t.co/t9THDzTDTg
— Live Law (@LiveLawIndia) October 20, 2021
आर्यन खानसह अरबाज मर्चंट, मुनुमन धामेचा या तिघांचाही जामीन अर्ज मुंबईतील विशेष एनडीपीएस कोर्टाने फेटाळून लावला आहे. आर्यनची अधिक चौकशी करण्यासाठी एनसीबीने त्याची कोठडी मागितली आहे. आर्यनचा संपूर्ण कटात समावेश असल्याता आरोप एनसीबीने केला आहे. त्यामुळे आर्थर रोड तुरुंगातील तिघांचा मुक्काम वाढला आहे. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश व्ही व्ही पाटील यांनी या प्रकरणावर सुनावणी घेतली. गेल्या गुरुवारी न्यायालयात तिन्ही आरोपींच्या जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण झाली होती. पण न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला होता. एनडीपीएसच्या विशेष न्यायालयाने आर्यन खानचा जामीन अर्ज पुन्हा एकदा फेटाळला. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश व्ही व्ही पाटील यांनी या प्रकरणावर सुनावणी घेतली. आर्यन खानसह अरबाज मर्चंट, मुनुमन धामेचा या तिघांचाही जामीन अर्ज मुंबईतील विशेष एनडीपीएस कोर्टाने फेटाळून लावला आहे.
इतर बातम्या:
Aryan Khan Drugs Case | शाहरुखला पुन्हा झटका, ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानचा जामीन फेटाळला
Aryan Khan Moves Bombay High Court Against Special Court Order Denying Bail In Drug Case