शरद पवारांना कानशिलात मारली, तरीही त्यांनी संयम पाळला, राणेंना डिफेंड करण्यासाठी शेलारांकडून दाखला

| Updated on: Aug 25, 2021 | 3:38 PM

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या कानशिलात एका व्यक्तिने लगावली होती. तेव्हा पवारांनी संयम पाळला आणि त्या व्यक्तिला माफ केलं. (ashish shelar)

शरद पवारांना कानशिलात मारली, तरीही त्यांनी संयम पाळला, राणेंना डिफेंड करण्यासाठी शेलारांकडून दाखला
ashish shelar
Follow us on

मुंबई: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या कानशिलात एका व्यक्तिने लगावली होती. तेव्हा पवारांनी संयम पाळला आणि त्या व्यक्तिला माफ केलं. पवारांसारख्या संयमी माणसासोबत राहुनही शिवसेनेला ते कळत नाही?, असा सवाल भाजप नेते आशिष शेलार यांनी केला. (ashish shelar defend narayan rane and allegations anil parab)

आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेवरून शिवसेनेवर हल्ला चढवला. यावेळी शेलार यांनी थेट पवारांसोबत घडलेल्या घटनेचा दाखलाच दिला. शरद पवारांना कानशिलात लावलेली देशाने पाहिली. त्यावेळी शरद पवारांनी संयम पाळून त्या व्यक्तीला माफ केलं. पण संयमी माणसासोबत राहूनही शिवसेनेला ते कळत नाही, अशी टीका शेलार यांनी केली.

ठाकरेंच्या पोटात दुखतंय

नारायण राणे मुख्यमंत्री होते त्यावेळीही उद्धव ठाकरेंनी षडयंत्र केलं. सुरेश प्रभूंना केंद्रात मंत्रिपद मिळालं, त्यावेळी ठाकरेंनी तेच केलं. आता कोकणातील नेत्याला केंद्रात मोठं पद मिळालं म्हणून उद्धव ठाकरेंच्या पोटात दुखत आहे, अशी टीका त्यांनी केली.

पवारांचीही नाराजी

अनिल परब गृहखात्यात हस्तक्षेप करत असल्याबद्दल शरद पवार यांनी एकदा नाराजी व्यक्त केली होती. कालही हेच अधोरेखित झालं आहे. हा मुद्दा गंभीर आहे. आमच्या माहितीनुसार अटकपूर्व जामीन अर्ज 4 ते साडे चारच्या दरम्यान निकाली निघाला त्याआधीच मंत्री अनिल परब सांगतायत की जामीन नाकारण्यात येणार आहे. याचा अर्थ दलालांमार्फत किंवा या प्रक्रियेमध्ये हस्तेक्षेप करण्याचा मंत्रिमहोदयांनी प्रयत्न केल्याची दाट शंका आहे. मुंबई उच्च न्यायालयाचा उल्लेख आहे. याचा अर्थ मुंबई उच्च न्यायालयाची बदानामी आणि अपमान करण्याचा हा प्रयत्न आहे, असं ते म्हणाले.

या प्रकरणाची सीबीआय चौकशी करा

या सगळ्या प्रकारामध्ये अंतिमत: आयपीएस अधिकारी केंद्राला जबाबदार असतात. नारायण राणे केंद्रीय मंत्री आहेत. राज्याचा एक मंत्री आयपीएस अधिकाऱ्यांना केंद्रीय मंत्र्याच्या अटकेसाठी फोन करत होते. कोर्टात त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात येईल, असा निवाडा ते घोषित करत होते. हे सगळं प्रकरण संशयास्पद आहे. याची सीबीआय चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. (ashish shelar defend narayan rane and allegations anil parab)

 

संबंधित बातम्या:

कुणाची कोथळा काढण्याची भाषा तर कुणाची एन्काऊंटरची; राणेंना शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या धमक्या

Anil Parab : नारायण राणेंनी बाह्या सरसावल्या, पहिला धक्का अनिल परबांना देण्याची तयारी

अटक आणि सुटकेच्या नाट्यानंतर नारायण राणे मीडियाशी संवाद साधणार; ‘करारा जवाब’ देणार?

(ashish shelar defend narayan rane and allegations anil parab)