काही सुपारीबाज पक्षांच्या माध्यमातून आमच्यावर हल्ले, संजय राऊत यांची राज ठाकरेंवर टीका

| Updated on: Oct 12, 2024 | 4:52 PM

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. जे भाजपला जमलं नाही ते मोदी शाह इतर पक्षांच्या माध्यमातून सुपारी देऊन काम करत असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी भाजप आणि मनसेवर जोरदार टीका केली आहे.

काही सुपारीबाज पक्षांच्या माध्यमातून आमच्यावर हल्ले, संजय राऊत यांची राज ठाकरेंवर टीका
राज ठाकरे, संजय राऊत
Follow us on

दसरा मेळाव्याला काही तास उरले आहेत. त्याआधी शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी टीव्ही ९ मराठी सोबत बोलताना आजची भूमिका काय असेल हे स्पष्ट केले. ते म्हणाले की, ५० वर्षापेक्षा जास्त काळ झाला. हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सुरु केलेली शिवसेनेची दसरा मेळाव्याची ही पंरपरा आहे. आजही कायम आहे. खंड पडणार नाही. मेळावा रोखण्याचे प्रयत्न झाले. पण तरी आम्ही ती मोडू दिली नाही. दसरा मेळावा हा महाराष्ट्राच्या सुंस्कृत महाराष्ट्राचा ठेवा आहे. उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राच्या संदर्भात त्यांची भूमिका स्पष्ट करतील. प्रत्येक दसऱ्या मेळाव्यात ते पक्षाची धोरण आणि दिशा ठरवत असतात.

आजचा मेळाव्याचं महत्त्व असं आहे लोकसभा निवडणुकीत आम्ही भाजपचा दारुण पराभव केला. त्यानंतर आजचा हा मेळावा आहे. आता लक्ष्य आहे विधानसभेत त्यांचा पराभव करायचा. शिवसेनेला संघटना म्हणून महाराष्ट्राला शिवप्रेमी जनता म्हणून उद्धव ठाकरे मार्गदर्शन करतील. कोणाचा खरा खोटा हा प्रश्न पडू नये. हा प्रश्न निवडणूक आयोगाने तयार केले किंबहुना मोदी-शाहांनी. महाराष्ट्राच्या विषयी त्यांच्यामध्ये कमालीचा द्वेष आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेचा रक्षण करणारे पक्ष कोणते तर शिवसेना आणि राष्ट्रवादी. हे प्रादेशिक पक्ष. महाराष्ट्र कमजोर करण्यासाठी हे पक्ष नष्ट करायचे. त्यातून हे सगळं घडतंय.

राजकारणात ते असतील तर मराठी माणसाचे हिताचे कोणते मुद्दे राज ठाकरे यांनी मांडलेत. आमची उणीधुणी काढण्यासाठी मोदी शहा कोणाला सुपारी देत असतील तर ते गंभीर बाब आहे. भाजपला जे जमले नाही. ते काही सुपारीबाज पक्षांच्या माध्यमातून आमच्यावर हल्ले करण्यात आले. एकच नाही आणखी काही पक्ष आहेत. उणीधुणी विषयी त्यांनी चिंता करु नये. त्यांनी आपल्या पक्षाचे अस्तित्व सांभाळावे. राज्यात मराठी माणसाच्या नावावर पक्ष सुरु केले पण टिकली ती फक्त उद्धव ठाकरे यांची शिवसेना.

ज्या मोदी शाहांनी शिवसेना पक्ष फोडून डुप्लीकेट शिवसेना निर्माण केली. त्यांना ताकद देण्याचे काम तुम्ही करत आहे. भाजप सोबत बगलबच्चे करत आहेत. ही लाजीरवाणी गोष्ट आहे. मतभेद दूर ठेवून महाराष्ट्राच्या हितासाठी आपण या महाराष्ट्राच्या शत्रूसोबत लढलं पाहिजे. तर आपण त्यांना बिनशर्त पाठिंबा देतोय. कधी बिनपॅड पाठिंबा देईल तुम्ही. कशासाठी या महाराष्ट्राच्या विरुद्ध असलेल्या प्रवृत्तींना पाठिंबा देत आहेत. महाराष्ट्र तोडायला ते निघालेले आहेत. तुम्ही त्यांच्या सोयीच्या भूमिका घेऊन महाराष्ट्राला त्रास का देताय.