उद्धव ठाकरे, संजय राऊत यांनी कोणत्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला होता?; अतुल भातखळकर भडकले

| Updated on: Dec 25, 2022 | 11:37 AM

दिशा सालियन प्रकरणाचा तपासच केला नसल्याचं सीबीआयने म्हटलं आहे. तरीही या प्रकरणात सीबीआयने क्लिनचीट दिल्याचं काही लोक सांगत आहेत.

उद्धव ठाकरे, संजय राऊत यांनी कोणत्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला होता?; अतुल भातखळकर भडकले
उद्धव ठाकरे, संजय राऊत यांनी कोणत्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला होता?; अतुल भातखळकर भडकले
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख राष्ट्रपिता असा केला होता. त्यावरून ठाकरे गटाच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी नवे राष्ट्रपित्यांनी कोणत्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला होता? असा सवाल करत अमृता फडणवीस यांना फटकारलं आहे. राऊत यांची ही टीका भाजप नेत्यांच्या चांगलीच जिव्हारी लागली असून त्यांनी राऊतांवर पलटवार केला आहे.

संजय राऊत यांच्या टीकेचा भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी समाचार घेतला आहे. संजय राऊत यांनी कोणत्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला होता? त्यांचे चालक मालक पालक ज्यांच्याकडे ते नोकरी करतात त्या उद्धव ठाकरेंनी कोणत्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला होता? असा सवाल करतानाच राऊतांनी वायफळ आणि फालतू बडबड करू नये. नाही तर पूर्वीचे दिवस येतील, असा धमकी वजा इशाराच अतुल भातखळकर यांनी राऊत यांना दिला आहे.

हे सुद्धा वाचा

भातखळकर यांनी दिशा सालियन प्रकरणावरही भाष्य केलं आहे. दिशा सालियन प्रकरणाचा तपासच केला नसल्याचं सीबीआयने म्हटलं आहे. तरीही या प्रकरणात सीबीआयने क्लिनचीट दिल्याचं काही लोक सांगत आहेत. त्यातून त्यांचा खरा चेहरा दिसत आहे.

या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन झाल्यानंतर त्यांची झोप उडाली आहे. हे सरकार दिशा सालियनला न्याय मिळवून देईलच, असं भातखळकर यांनी सांगितलं.

ओबीसींच्या प्रश्नावरही त्यांनी भाष्य केलं. केंद्र सरकारने आपली भूमिका मान्य केली आहे. रोहिणी आयोगाची स्थापना केली असून आरक्षण कसे द्यायचे, रोहिणी आयोगाच्या अहवालानंतर केंद्र सरकार निर्णय घेणार आहे, असं ते म्हणाले.

दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनी दैनिक सामनातील रोखठोक सदरातून भाजपला डिवचलं आहे. अमृता फडणवीस हे एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे आणि त्यांची मते त्या मांडत असतात. आता त्यांनी एक मत मांडले, ”आपल्या देशाचे दोन राष्ट्रपिता आहेत. महात्मा गांधी हे जुन्या भारताचे, तर नरेंद्र मोदी हे नवीन भारताचे राष्ट्रपिता आहेत!”

सौ. फडणवीस यांचे स्वतंत्र विचार असू शकतात आणि एक नागरिक म्हणून त्यांना आपली मते मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण सौ. फडणवीस यांनी मांडलेल्या विचारांशी त्यांचा पक्ष सहमत आहे काय?, असा सवाल राऊत यांनी केला होता.