ठाकरे सरकारने पोलिसांचे पोतेरे करून टाकलंय; दिल्ली पोलिसांच्या कारवाईनंतर भातखळकरांचा हल्लाबोल

| Updated on: Sep 15, 2021 | 5:44 PM

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने सहा दहशतवाद्यांना अटक केली आहे. त्यामध्ये धारावीतील एकाचा समावेश आहे. या मुद्द्यावरून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. (atul bhatkhalkar slams maha vikas aghadi)

ठाकरे सरकारने पोलिसांचे पोतेरे करून टाकलंय; दिल्ली पोलिसांच्या कारवाईनंतर भातखळकरांचा हल्लाबोल
atul bhatkhalkar
Follow us on

मुंबई: दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने सहा दहशतवाद्यांना अटक केली आहे. त्यामध्ये धारावीतील एकाचा समावेश आहे. या मुद्द्यावरून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. ठाकरे सरकारने पोलिसांचे पोतेरे केलं आहे. दिल्ली पोलीस मुंबईत येऊन कारवाई करते. आपलं दहशतवाद विरोधी पथक काय करतंय?, असा सवाल अतुल भातखळकर यांनी केला आहे. (atul bhatkhalkar slams maha vikas aghadi)

अतुल भातखळकर यांनी ट्विट करून हा सवाल केला आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यांनी पोलिसांना कोणते टार्गेट पूर्ण करण्यासाठी गुंतवून ठेवलं होतं, हे सगळ्या जगाला ठाऊक झाले आहे. ठाकरे सरकारने पोलिसांचे पोतेरे करून टाकले. दिल्ली पोलीस इथे येऊन कारवाई करतात, आपले दहशतवाद विरोधी पथक काय करते आहे? असा सवाल भातखळकर यांनी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना विचारला आहे.

शेलार यांचाही हल्लाबोल

भाजप नेते आशिष शेलार यांनीही पत्रकार परिषद घेऊन याच मुद्द्यावर ठाकरे सरकारला घेरलं. नॅान कॅाग्निजेबल ऑफेन्समधे केंद्रीय मंत्र्यांना अटक करणारे राज्याचे पोलिस, पत्रकारांना हात नाही, पाय लावू अशी भाषा करणारे पोलिस, विद्यमान आमदाराला लुक आउट नोटीस काढण्याचा प्रताप करणारे पोलिस दहशतवाद्यांच्या बाबतीत का झोपले होते? हे गृहमंत्री स्पष्ट करतील का? या दहशतवादी प्रकरणाची इंटेलिजन्स माहिती पोलिसांना, गृहमंत्र्यांनी होती तर मग एका विशिष्ट वर्गाबाबत मवाळ भूमिका असं राजकीय प्रकरण नाही ना? असा सवाल करत पोलिसांच्या इंटेलिजन्स फेल्युअरवर गृहमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी शेलार यांनी केली.

गृहमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी

आता सरकार बैठका घेतल असलं तरी झालेल्या अक्षम्य दुर्लक्षावर आता पांघरुण घालता येणार नाही. राजकर्ते पोलिसांच लक्ष नको त्या विषयात घालतात. मग अशा घटना घडतात. आमचे पोलिस सक्षम आहेत. पण राजकीय दबाव, सरकारची गटबाजी, वसुलेबाजी, आणि सौदेबाजी यामुळे ही स्थिती आली असं ही ते म्हणाले. चौकशी अजून वाढवावी आणि गृहमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

 

रेल्वेचीही बैठक

दिल्लीत पकडलेल्या दहशतवाद्यांचा मुंबई लोकलमध्ये बॉम्ब स्फोट घडवून आणण्याचा प्लॅन होता अशी माहिती उघड झाली आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासन सतर्क झालं आहे. त्याचाच एक भाग म्हणून रेल्वे पोलिसांची एक महत्त्वाची बैठक रेल्वे मुख्यालयात आयोजित करण्यात आली आहे. रेल्वे आयुक्त कैसर खालिद यांच्यासह डीआरएमचे मोठे अधिकारीही यावेळी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत रेल्वेच्या सुरक्षेवरही चर्चा होणार आहे, असं सूत्रांनी सांगितलं.

डी गँगशी संबंध?

दरम्यान, अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांचा संबंध अंडरवर्ल्डशी असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच यातील दोन दहशतवादी डी- गँगशी संबंधित असल्याचीही माहिती मिळतेय. सध्या देशात सणांची धूम आहे. गणेशोत्सव, नवरात्री या सणांमुळे देशात अनेक ठिकाणी गर्दी होते. याच गर्दीच्या पार्श्वभूमीवर बॉम्बस्फोट घडवण्याची दहशतवाद्यांची तयारी होती.

महाराष्ट्र, यूपी, दिल्ली रडारवर

दिल्ली पोलीस तसे एटीएसने देशातील विविध भागातून एकूण सहा जणांना अटक केले आहे. यामध्ये महाराष्ट्रात राहणाऱ्या एकाला राजस्थानमधील कोटा येथून ताब्यात घेण्यात आलं आहे. तर दोघांना दिली तेसच तीन जणांना उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आलंय. या संशयितांच्या टार्गेटवर महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश तसेच दिल्लीमधील काही ठिकाणं होती. (atul bhatkhalkar slams maha vikas aghadi)

 

संबंधित बातम्या:

दिल्लीत जेरबंद केलेला दहशतवादी धारावीतील, गृहमंत्री अ‍ॅक्शन मोडमध्ये; तातडीने बोलावली बैठक

मुंबईसह राज्यात कट कारस्थाने शिजत असताना महाराष्ट्र एटीएस झोपलंय का?; दहशतवाद्याच्या अटकेनंतर शेलारांचा सवाल

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय संपूर्ण देशासाठी हवा होता, ओबीसी आरक्षणावरून केदार यांचं मोठं विधान

(atul bhatkhalkar slams maha vikas aghadi)