बांद्रा इस्टेटमध्ये गोळीबाराची घटना घडली आहे. राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्यावर गोळीबार झाला आहे. बाबा सिद्धिकी यांच्यावर लिलावती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बाबा सिद्धिकी यांची प्रकृती गंभीर असल्याचं बोललं जात आहे. रुग्णालयाच्या बाहेर कार्यकर्ते जमा व्हायला सुरुवात झाली आहे. दोन जणांना ताब्यात घेतल्याची माहिती देखील पुढे आली आहे. या गोळीबारामुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे. बाबा सिद्धिकी हे आमदार झिशान सिद्धिकी यांचे वडील आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. अभिनेते सयाजी शिंदे यांच्या पक्षप्रवेशाच्या वेळी देखील ते उपस्थित होते.
काही वेळापूर्वीच कार्यलयातून निघत असताना तीन जण तोंडावर रुमाल बांधून आले होते. त्यांनी तीन राऊंड फायर केले आणि फरार झाले. बाबा सिद्धिकी यांना एक गोळी लागल्याचं बोललं जात आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच बाबा सिद्धिकी यांनी काँग्रेसमधून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.
बाबा सिद्धिकी यांच्यावर गोळीबाराची झाल्याची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फोनवरुन रुग्णालय प्रशासनाकडून माहिती घेतली आहे. बाबा सिद्धिकी