मुंबई : महाराष्ट्रात (Maharashtra) सध्या मशिदींवरील भोंग्यावरुन वातावरण तापवलं जात आहे. भोंग्यांना हनुमान चालिसेनं (Hanuman Chalisa) प्रत्युत्तर देण्याचा इशारा राज ठाकरेंनी दिला होता. त्यावरुन संजय राऊत यांनी वेळोवेळी भाजप आणि मनसेच्या मुद्द्याला फटकारलंय. दरम्यान, संजय राऊत यांनी बाळासाहेब ठाकरेंनी (Balasaheb Thackeray) नेमका मुस्लिमांचा रस्त्यावर केल्या जाणाऱ्या नमाज पठणाचा विषय कसा हाताळला होता, याची आठवण यावेळी करुन दिली. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. चर्चेतून प्रश्न सोडवले जातात, असं संजय राऊत यांनी म्हटलंय. फक्त भूमिका घेऊन बाळासाहेब ठाकरे थांबले नाही, तर त्यांनी तोडगा काढण्यासाठी आणि प्रश्न सोडवण्यासाठीही प्रयत्न केले, असंही राऊतांनी म्हटलंय. युतीचं सरकार असताना मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या मदतीनं बाळासाहेबांनी मशिंदीचा प्रश्न कसा निकाली काढला होता, याचा किस्साच संजय राऊतांनी यावेळी सांगितलंय.
संजय राऊत यांनी यावेळी बोलताना म्हटलंय, की..
शिवसेना प्रमुखांना सातत्यानं अनेक प्रश्न मुस्लिमांबाबत चर्चेतून सोडवले. त्यांनी निश्चितच एक आक्रमक भूमिका घेतली. रस्त्यावरचे नमाज ही त्या काळातली एक समस्या होती. बाळासाहेबांनी तेव्हा आव्हान दिलं होतं, की रस्त्यावरचे नमाज बंद करा. भोंगे उतरवा. पण ही भूमिका घेऊन ते थांबले नाहीत. महाराष्ट्रात जेव्हा युतीचं सरकार आलं, तेव्हा मनोहर जोशी मुख्यमंत्री होते आणि मुंडे उपमुख्यमंत्री होते. तेव्हा त्यांनी सर्व प्रमुख मुस्लिम मौलवींनी बोलवून सांगितलं की तुम्ही ते स्त्यावरचे नमाज बंद केले पाहिजे. तेव्हा रस्त्यावरचे नमाज बंद करण्यासाठी काय केलं पाहिजे, याबाब त्यांच्याशी चर्चा केली.
तेव्हा ते मौलवी म्हणाले, की आमच्या मशिदींचा आकार लहान आहे. आम्हाला नमाज पडायला जागा नाही प्रार्थनेसाठी.. उपाय काय..? आमच्या मशिंदीसाठी जागा वाढवण्यासाठी एफएसआय वाढवून द्या… म्हणजे मशिदीची उंची वाढवू. तेव्हा बाळासाहेबांनी ही बाब मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना सांगितली. एफएसआय वाढवून देण्यात आला.. मग रस्त्यावरचे नमाज बंद झाले.. तोडगा काढण्याची हिंमत तेव्हा शिवसेनेत, बाळासाहेबांमध्ये होती.
भाजपला आता भोंग्याबाबत जाग आली आहे. आता ते झोपेतून उठले आहे, असा टोलाही संजय राऊत यांनी यावेळी लगावला आहे. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भोंग्याबाबत राष्ट्रीय धोरण लागू करावं, असा सल्लाही राऊतांनी यावेळी दिला आहे.
उद्धव ठाकरेंची माफियागिरी, माझ्यावर 12 आरोप लावले, चौकशीच्या तिसऱ्या दिवशी सोमय्यांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis Video : हे सगळे एकाच बापाची औलाद निघाले, फडणवीसांच्या या वक्तव्याचा संदर्भ काय?