मुंबई : सध्याच्या वातावरण बदलामुळे मुंईमध्ये एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईमध्ये भविष्यात फक्त इलेक्ट्रिक बसेस खरेदी करण्यात येणार आहेत. तसेच 2025 पर्यंत बेस्टच्या ताफ्यात 100% इलेक्ट्रिक बसेस येतील. आगामी काळात 1900 एलेक्ट्रिक बसेस खरेदी केल्या जातील, अशी माहिती पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यानी दिली.
वातावरणीय बदलाचा मुंबईवर मोठा परिणाम होत आहे. अचानकपणे वातावरण बदलल्यामुळे अतिवृष्टीसारख्या समस्या उद्भवत आहेत. त्यामुळे सरकारतर्फे महत्त्वाचं पाऊल जात आहे. यापुढे एखादी बस घ्यायची असेल तर किंवा बस भाडेतत्वावर घ्यायची असेल तर ती फक्त फक्त इलेक्ट्रिक बस असेल. आम्ही बेस्टच्या डेपोमध्ये चार्जिंग स्टेशन सुरु करणार आहेत. अपारंपारिक विजेचा वापर करण्यावर आपल्याला यानंतर भर द्यावा लागेल, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
तसेच पुढे बोलताना त्यांनी मुंबईमध्ये आगामी काळात सगळ्या बसेस इलेक्ट्रिक असतील अशी माहिती दिली. “आतापर्यंत बेस्टच्या ताफ्यात 386 इलेक्ट्रिक बस आहेत. डबल डेकर बस ही मुंबईची ओळख आहे. आज 60 इलेक्ट्रिक बसेसचा लोकार्पण सोहळा पार पडलाय. आम्ही 200 डबल डेकर इलेक्ट्रिक बसेस लवकरच घेणार आहोत, वातावरणीय बदलांना तोंड देण्यासाठी या बसेस वापरणं खूप महत्त्वाचं आहे,” असं आदित्य ठाकरे म्हणाले.
तसेच 2025 पर्यंत बेस्टच्या ताफ्यात 100% इलेक्ट्रिक बसेस येतील. आगामी काळात आम्ही 1900 इलेक्ट्रिक बसेस खरेदी करणार आहोत. महाराष्ट्राच्या अनेक शहरातदेखील आम्ही इलेक्ट्रिक बसेस चालवण्याचा प्रयत्न करणार आहोत, असेदेखील आदित्य यांनी सांगितले.
इतर बातम्या :
नरेंद्र मोदी हुकूशाहीवर विश्वास ठेवतात? शहांनी सांगितलं, का असे सवाल केले जातात?
आधी चीन, नंतर लेबनॉन, आणि आता देश-महाराष्ट्र अंधारात बुडणार? विजेचं संकट कसं काय? वाचा सविस्तर
VIDEO : Breaking | शिवसेनेच्या 3 सदस्यांचा भाजपमध्ये प्रवेश, सेनेच्या आमदाराचं डिपॉझिट जप्त करणार-निलेश राणेhttps://t.co/WfdRvfhnBz | #UddhavThackeray | #NarayanRane | #Mumbai | #pune | #BJP | #Maharashtra |
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 10, 2021
(best have 100 percent electric buses by 2025 purchase only electric bus information given by aditya thackeray)