Bhai Dooj 2020 | औक्षणासाठी शुभ मुहूर्त कोणता? भाऊबीजेची आख्यायिका जाणून घ्या

| Updated on: Nov 15, 2020 | 4:15 PM

या दिवशी बहीण भावाच्या दृढ आयुष्य आणि समृद्धीची प्रार्थना करते.

Bhai Dooj 2020 | औक्षणासाठी शुभ मुहूर्त कोणता? भाऊबीजेची आख्यायिका जाणून घ्या
Follow us on

मुंबई : भाऊबीजचा सण येत्या सोमवारी 16 नोव्हेंबरला देशभरात साजरा केला जाणार आहे (Bhai Dooj 2020). भाऊबीज दरवर्षी कार्तिक शुक्ल पक्षाच्या द्वितीयेला साजरी केली जाते. या दिवशी बहीण भावाच्या दृढ आयुष्य आणि समृद्धीची प्रार्थना करते. या दिवशी बहीण भावाचं औक्षण करुन त्याच्या सुखी आयुष्याची प्रार्थना करते. भाऊ बहीणीला ओवाळणी देतात (Bhai Dooj 2020).

यंदा पाडवा आणि भाऊबीज एकत्र आली आहे. त्यामुळे भाऊबीजेचा नेमका मुहूर्त काय याबाबत अनेकांच्या मनात साशंकता असेल. चला तर जाणून घेऊ भाऊबीजेचा शुभ मुहूर्त

भाऊबीजेच्या दिवशी भावाला कधी ओवाळायचं?

– कार्तिक शुद्ध द्वितीया प्रारंभ – 16 नोव्हेंबर 2020, सकाळी 7 वाजून 7 मिनिटे

– कार्तिक शुद्ध द्वितीया समाप्ती – 17 नोव्हेंबर 2020, पहाटे 03 वाजून 56 मिनिटे

– औक्षण करण्याचा शुभ मुहूर्त – दुपारी 1 वाजून 18 मिनिटे ते दुपारी 03 वाजून 38 पर्यंत

भाऊबीज कथा

भगवार सूर्य नारायणाच्या पत्नीचे नाव छाया होते. त्यांना यमराज आणि यमुना या दोघांना जन्म दिला. यमुनेचं यमराजवर अत्यंत प्रेम होते. यमुना यमराजला अनेकदा तिच्या घरी भोजन करण्याचे आमंत्रण द्यायची मात्र, कामाच्या व्यस्ततेमुळे यमराज नेहमी तिच्या घरी जाणे टाळायचे. कार्तिक शुक्लच्या दिवशी यमुनेने यमराजला तिच्या घरी भोजन करण्यासाठी निमंत्रण देत त्यांच्याकडून वचन घेतलं (Bhai Dooj 2020).

यमराज यांनी विचार केला की मी तर प्राण घेणारा आहे. मला कुणीही आपल्या घरी बोलवू इच्छित नाही. माझी बहीण ज्या प्रेमाने आणि आदराने मला तिच्या घरी बोलावत आहे, तिचा मान राखणे माझा धर्म आहे. बहीणीच्या घरी जाताना यमराजने नरकात निवास करणाऱ्या जीवांना मुक्ते केलं. यमराजला आपल्या घरी आलेलं पाहून यमुना अत्यंत प्रसन्न झाली. तिने पूजा केली आणि यमराजला जेवायला दिलं. यमुनाने केलेल्या आदरातिथ्याने यमराज भारावून गेते आणि त्यांनी यमुनेला वरदान मागण्यास सांगितले.

तेव्हा यमुना म्हणाली, भ्राता तुम्ही दरवर्षी याच दिवशी माझ्या घरी यायचं. जी बहीण या दिवशी आपल्या भावाचं औक्षण करेल, त्याला तुमचं भय राहणार नाही. यावर यमराज यांनी तथास्तू म्हटलं आणि यमुनेला अमुल्य वस्त्र आणि दागिने दिले.

त्यादिवशीपासून, कार्तिक शुद्ध द्वितीयेला जी बहीण आपल्या भावाला घरी बोलावून त्याचं औक्षण करेल, त्याचा आदर करेल त्याला यमराजची म्हणजेच मृत्यूची भीती राहत नाही, अशी दंतकथा आहे. त्यामुळे या दिवशी यमराज आणि यमुनेची पूजा केली जाते.

यमद्वितीयेला अनेक शुभ योग

यंदा 2020 मध्ये भाऊबीजेच्या दिवशी अनेक चांगले आणि अद्भूत शुभ योग जुळून आले आहेत. या दिवशी सर्वार्थ सिद्धी नामक योग सकाळी 6 वाजून 16 मिनिटे ते दुपारी 2 वाजून 41 मिनिटांपर्यंत असणार आहे. अमृत काळ मुहूर्त सकाळी 6 वाजून 52 मिनिटे ते सकाळी 8 वाजून 17 मिनिटांपर्यंत असेल. याशिवाय, अभिजीत मुहूर्त सकाळी 11 वाजून 44 मिनिटे ते 12 वाजून 31 मिनिटांपर्यंत असेल.

Bhai Dooj 2020

संबंधित बातम्या :

दिवाळीला मोदी सरकारला मोठं ‘गिफ्ट’, परकीय चलन साठ्याचा नवा विक्रम

सुप्रिया सुळेंकडून पुन्हा नम्र विनंती, यावर्षी पाडव्याला गोविंदबागेत न येता डिजीटल शुभेच्छा द्या