मुंबई : मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी भाजपला मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आधीच्या निवडणुकीतील 82 नगरसेवक टिकवून दाखवण्याचं आव्हान दिलंय. तसेच बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतने मुंबईची तुलना पाकिस्तानशी केली तेव्हा भाजपचे सर्व नेते गप्प होते, याची आठवणही करुन दिली. यावेळी भाई जगताप यांनी कोरोना काळात भाजपने राजकारण करुन चोरांना पाठिशी घातल्याचाही आरोप केला. यावरुन त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला चढवला (Bhai Jagtap criticize BJP over Kangana Ranaut statement on Mumbai comparing with Pakistan).
मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप म्हणाले, “माझं त्यांना आव्हान आहे की त्यांनी 82 आहेत ते टिकवून दाखवावे. याअगोदरही मी बोललो आहे. या मुंबईत तुम्ही जी लबाडगिरी केली. वेगवेगळ्या पद्धतीने वॉर्ड रचना करून तुम्ही हा आकडा बनवलाय. आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. जेव्हा कंगना राणावतने मुंबईची तुलना पाकिस्तानशी केली त्यावेळी हे सगळे नेते गप्प बसले होते. मुंबईची ओळख ही मिनी इंडिया आहे. मात्र, कंगनाच्या वक्तव्यावर भाजप नेते गप्प का बसले होते? मुंबईकर यांना ओळखुन चुकले आहेत.”
Attended the protested organised by Sion Koliwada Block 173 President Sakharam Sawant ji which was presided by MRCC President @BhaiJagtap1 ji at Pratiksha Nagar market against the Modi govt who failed to control the rising fuel and gas prices. pic.twitter.com/pDYXsJuvEV
— Ganesh Kumar Yadav (@GaneshYadavINC) July 10, 2021
“कोरोनाच्या काळात देवेंद्र फडणवीस कोणाला वाचवायला गेले होते? ते रेमडेसिविर औषधाचा काळाबाजार करणाऱ्याला वाचवण्यासाठी गेले. पोलिसांना दादागिरी करून पोलीस स्टेशनमध्ये चोरांना वाचवायला गेले होते. ऑक्सीजनचा तुटवडा होता तेव्हा देवेंद्र फडणवीस कुठे गेले होते? 18 महिन्यांत भाजपचे नेते कुठे होते? काँग्रेसचे कार्यकर्ते मी त्यावेळी रस्त्यावर होतो,” असं त्यांनी सांगितलं.
भाई जगताप म्हणाले, “आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोल डिझेल घरगुती गॅस यांच्या किमती कमी आहेत, पण भारतात शंभरी पार करून गरिबांचं कंबरडं महागाईमुळे तुटलंय. दुसरीकडे भाजपचे सेलिब्रिटी काँग्रेसच्या काळात या दरवाढीवर टीका करत होते ते आता कुठे लपून बसले आहेत? हा एल्गार केंद्र सरकार विरोधात आहे. पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ या देशांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किमती खूपच कमी आहेत आणि आपल्या देशात इंधनाने शंभरी पार केलीय.”
“दिग्दर्शक सापटे यांच्या आत्महत्येप्रकरणी बोलताना भाई जगताप म्हणाले, “पोलिसांना असा संवेदनशील तपास करण्यासाठी वेळ दिला पाहिजे. ही संवेदनशील घटना आहे. त्याचा निषेध आहे. सापटे यांचे आरोपी नक्कीच पकडले जातील. भाजपा चोर दरोडेखोर यांच्याच मागे आहे,” अशी टीका भाई जगताप यांनी केली.
“अध्यक्षपदाची बातमी तुम्हीच मला देत आहे माझ्याकडे ही माहिती नाही. माझ्या पक्षात अशी काही चर्चा नाही. आपण जर तर वर जाण्यापेक्षा खरं काय ते लवकरच कळेल,” असंही ते म्हणाले. मास्क न घातल्यावरुन ते म्हणाले, “मला कोरोनाच्या काळात सोशल डिस्टन्सिंग पाळता आली नाही याबद्दल मी माफी मागतो. पावसामुळे मास्क भिजले आहेत. मला बोलताना सफोकेशन होतं म्हणून मी मास्क लावला नाही.”