मुंबई: सुशांतसिंह प्रकरणही सीबीआयकडे गेलेलं आहे. त्याचं काय झालं? असा सवाल काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी केला आहे. तसेच गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपाची सीबीआय चौकशी करणार असून चौकशी अहवाल आल्यावरच त्यावर भाष्य करता येईल, असंही जगताप यांनी म्हटलं आहे. (bhai jagtap reaction on Preliminary Inquiry against Anil Deshmukh)
‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना भाई जगताप यांनी हा सवाल केला. सर्वोच्च न्यायालयाने सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण सीबीआयकडे दिलं होतं. आज दोन महिन्यापेक्षा अधिक कालावधी लोटला आहे. या प्रकरणात कुणालाही अटक झालेली नाही. एवढेच नव्हे तर या प्रकरणाचा अहवालही अद्याप आलेला नाही. या चौकशीचं नेमकं काय झालं? असा सवाल भाई जगताप यांनी केला आहे.
काँग्रेसचं वेट अँड वॉच
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपाची सीबीआय चौकशी करणार आहे. 15 दिवसात ही चौकशी होणार आहे. अहवाल आल्यानंतर जी कारवाई व्हायची ती होईलच. तोपर्यंत त्यावर घाईघाईने प्रतिक्रिया देणं योग्य होणार नाही, असंही ते म्हणाले.
काँग्रेसच्या इमेजची काळजी नको
यावेळी त्यांनी भाजपवरही टीका केली. भाजपने काँग्रेसची इमेज कशी झाली आहे याची काळजी करू नये. देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांची जी इमेज झाली आहे, ते आधी पाहावं. काँग्रेस ही गल्ली बोळातील नाही. 137 वर्षाचा काँग्रेसचा इतिहास आहे. ही एक चळवळ आहे. काँग्रेसची काळजी भाजप नाही तर जनताच करेल, असा टोलाही त्यांनी लगावला.
भाजपकडून देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी
परमबीर सिंग यांनी पोलीस आयुक्त पदावरुन हटवल्यानंतर आरोप केले आहेत. ते पदावर असताना आरोप केले असते तर त्याला वेगळं महत्व राहिलं असतं. सीबीआय चौकशी झाल्यानंतर सत्य बाहेर आल्यानंतर योग्य निर्णय घेण्यात येईल, असं भाई जगताप यांनी म्हटलं आहे. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मुंबई हायकोर्टाच्या निर्णयानंतर अनिल देशमुखांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.
देशमुखांना झटका
दरम्यान, गृहमंत्री अनिल देशमुख यांना मोठा झटका बसला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुख यांनी निलंबित पोलीस निरीक्षक सचिन वाझेंना 100 कोटी रुपये वसुलीचं टार्गेट दिलं होतं, असा दावा केला आहे. या प्रकरणाची सीबीआयमार्फत प्राथिक चौकशी करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. 15 दिवसात हा चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेशही कोर्टाने दिल्याने देशमुख यांच्यासाठी हा मोठा झटका असल्याचं मानलं जात आहे. (bhai jagtap reaction on Preliminary Inquiry against Anil Deshmukh)
देशमुख तुम्ही कायद्यापेक्षा मोठे नाही
डायरेक्टर जनरल सीबीआय हे चौकशी करतील आणि मला बोलावलं जावं असं कोर्टाने म्हटलं आहे. फक्त माझीच याचिका कोर्टाने ऐकली. कोर्टाने माझं खूप कौतुक केलं, कोणीतरी एक शूर आहे, जे समोर आले आहेत. एवढ्या मोठ्या 100 कोटीच्या प्रकरणात कोणी एक तरी शूर आहे जे समोर आले आहेत, असे कोर्टाने सांगितल्याची माहिती जयश्री पाटील यांनी दिली. (bhai jagtap reaction on Preliminary Inquiry against Anil Deshmukh)
LIVETV – ठाकरे सरकारला मोठा झटका, परमबीर सिंगांच्या आरोपांचा तपास सीबीआयकडे, हायकोर्टाचा मोठा निर्णय https://t.co/ImprYhMJl7 #ParamBirSingh pic.twitter.com/4mSmKkAzPe
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 5, 2021
संबंधित बातम्या:
अनिल देशमुख ही मोघलाई नाही, खंडणीखोर गृहमंत्री जेलमध्ये जातील, वकील जयश्री पाटील आक्रमक
परमबीर सिंग यांच्या अनिल देशमुख यांच्या विरोधीतील याचिकेवर मुंबई हायकोर्टात काय घडलं?