‘मोदी ओरिजनल ब्रँड’, शिवसेना भवनासमोर बॅनर्स लावून भाजपने उद्धव ठाकरे यांना डिवचले

| Updated on: Jun 09, 2024 | 10:29 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा दिल्लीत पंतप्रधान पदाची शपथ घेणार असून यासाठी देशभरात मोठ्या प्रमाणात महायुतीकडे बॅनरबाजी करण्यात आली आहे. मुंबई भारतीय जनता पक्षाकडून लावण्यात आलेल्या या बॅनर्सवर नरेंद्र मोदी यांच्यासोबत मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांचा फोटो आहे.

मोदी ओरिजनल ब्रँड, शिवसेना भवनासमोर बॅनर्स लावून भाजपने उद्धव ठाकरे यांना डिवचले
narendra modi banner
Follow us on

भाजप नेते नरेंद्र मोदी रविवारी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेत आहेत. लोकसभा २०२४ च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला पूर्ण बहुमत मिळाले नाही. परंतु राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार सत्तेवर येत आहेत. यामुळे महाराष्ट्रात भाजपचा विरोधक झालेला शिवसेना उबाठाला डिवचण्याचे काम भाजपने सुरु केले आहे. भाजपकडून सरळ शिवसेना भवनासमोर बॅनर्स लावले आहेत. ‘मोदी ओरिजनल ब्रँड’, अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आहे. त्यामाध्यमातून उद्धव ठाकरे आणि शिवसेना उबाठाला डिवचण्याचा पर्यत्न केले गेला आहे.

महाविकास आघाडीसह उद्धव ठाकरे यांना डिवचले

पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा दिल्लीत पंतप्रधान पदाची शपथ घेणार असून यासाठी देशभरात मोठ्या प्रमाणात महायुतीकडे बॅनरबाजी करण्यात आली आहे. मुंबई भारतीय जनता पक्षाकडून लावण्यात आलेल्या या बॅनर्सवर नरेंद्र मोदी यांच्यासोबत मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांचा फोटो आहे. शिवसेना भवन परिसरात भाजपची बॅनरबाजी केली आहे. त्यावर मोदी ओरिजनल ब्रँड असे लिहिले आहे. शिवसेना भवन परिसरात मोदींच्या बॅनरबाजीतून महाविकास आघाडीसह उद्धव ठाकरे यांना डिवचले जात आहे.

हे सुद्धा वाचा

रोखठोकमधून पुन्हा मोदींवर हल्ला

रोखठोकमध्ये सामनाचे संपादकव शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती हल्ला केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, 18 व्या लोकसभेची निवडणूक झाली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या भाजपचा दारुण पराभव जनतेने केला. 2014 आणि 2019 प्रमाणे मोदी यांना सरकार स्थापनेसाठी साधे बहुमत मिळवता आले नाही. देशाच्या जनतेने सत्तेतील पासिस्ट प्रवृत्तींचा पराभव केला. भाजपला 234 जागाच मिळाल्या व बहुमताच्या आकडय़ापासून 40 जागा दूर ठेवले. नरेंद्र मोदींचा हा पराभव आहे. तरीही मोदी यांनी आता ‘एनडीए’चे सरकार म्हणून तिसऱ्यांदा शपथ घ्यायचे ठरवले.

कुबड्या घेऊन सरकार

मोदी ‘रामभक्त’ आहेत. त्यांनी रामाचे मंदिर उभे केले, पण रामायण-महाभारताचा विचार स्वीकारला नाही. सत्तेवरील व्यक्ती अध:पतित झाल्या, भ्रष्ट बनल्या. सज्जनांचा उपदेश त्यांच्या कानावरून जाऊ लागला म्हणजे आधी त्यांच्या साऱ्या कुलाचा, देशाचा नाश होतो व मग ते पदभ्रष्ट होतात आणि जगात त्यांची अपकीर्ती होते. भाजप व मोदी यांच्या बाबतीत तेच घडले आहे. लोकसभा निकालाने मोदी व त्यांच्या लोकांचे पाय जमिनीवर येतील असे वाटले होते, पण बहुमत नसतानाही मोदी नितीश कुमार, चंद्राबाबू, चिराग पासवान यांच्या कुबडय़ा घेऊन सरकार बनवीत आहेत, असे संजय राऊत यांनी रोखठोकमध्ये म्हटले आहे.