मुंबई : भ्रष्टाचाराविरुद्ध लढणाऱ्या भाजपची भाजपच्याच नगरसेविकेवर झालेल्या आरोपांमुळे कोंडी झाल्याचे पहायला मिळात आहे, कारण भाजपच्या नगरसेविका रजनी केणी यांच्याकडे मुंबई भाजपने कुटुंबियांकडून ठेकेदाराला धमकावल्या प्रकरणी स्पष्टीकरण मागितले आहे. हेच नाही तर भाजप नगरसेविका रजनी केणी यांना मुंबई भाजप शिस्तभंगाची कारवाई करत निलंबित करण्याच्या तयारीत असल्याचीही माहिती मिळत आहे.
भ्रष्टाचार,गैरव्यव्हार खपवून घेतला जाणार नाही
भाजपच्या नगरसेविका रजनी केणी यांच्यावर कुंटुंबियामार्फत एका ठेकेदाराला धमकावल्याचे आरोप झाले आहेत. त्यामुळे भ्रष्टाचार, गैरव्यव्हार खपवून घेतला जाणार नाही, अशी भूमिका मुंबई भाजपने घेतली आहे. रजनी केणींच्या मुलावर बीएमसी कंत्राटदाराला धमकावल्याचा आरोप आहे. याच प्रकरणात मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. रजनी केणींचा पक्षातील सर्व पदांचा आणि जबाबदाऱ्यांचा राजीनामा का घेऊ नये? याचं स्पष्टीकरण देण्याची मागणी मुंबई भाजपने केली केली आहे.
ठेकेदाराला टेंडर मागे घ्यायला लावल्याचा आरोप
रजनी केणी यांच्या मुलाने मुलुंडमधील ठेकेदाराला धमकावल्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणी नवघर पोलीस स्टेशन मध्ये ठेकेदाराकडून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. नगरसेविका रजनी केणी यांच्याविभागातील एक काम एका ठेकेगाराला ऑनलाईन टेंडरींगच्या माध्यमातून मिळाले होते. मात्र, रजनी केणी यांचा मुलगा नमित केणीने या ठेकेदाराला धमकावत टेंडर मागे घेण्यास भाग पाडलं होतं असा आरोप ठेकेदाराचा आहे. एकीकडे भाजप भ्रष्टाचाराविरुद्ध लढत असताना असा प्रकार घडल्याने आपल्याला आपल्या पदावरून मुक्त का करू नये? असा सवाल मुंबई भाजपनं केलाय. मुंबई भाजप अध्यक्षांनी रजनी केणींकडे याबाबत स्पष्टीकरण मागितले आहे. त्यामुळे भाजपच्या नगरसेविकेमुळे भाजपचीच कोंडी झाल्याचे दिसून येत आहे.