Maharashtra Election Results 2024: मुंबई कोणाची? मुंबईतील या सर्व विजयी उमेदवारांची यादी पाहून ठरवा

| Updated on: Nov 24, 2024 | 1:19 PM

mumbai election result: मुंबईतील ३६ जागांपैकी १९ जागांवर भाजपने उमेदवार उभे केले होते. त्यात त्यांचे १५ उमेदवार विजयी झाले. उद्धव ठाकरे यांनी २२ जागा लढवल्या होत्या. त्यात १० जागांवर त्यांचे उमेदवार विजयी झाले. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने १४ जागी उमेदवार दिले होते. त्यांना ६ ठिकाणी यश आले.

Maharashtra Election Results 2024:  मुंबई कोणाची? मुंबईतील या सर्व विजयी उमेदवारांची यादी पाहून ठरवा
उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस
Follow us on

Mumbai Election Result: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी आला. या निकालात महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले. राज्यातील सर्व विभागात महायुतीचे वर्चस्व दिसले. परंतु मुंबई कोणत्या शिवसेनेची? मुंबई कोणत्या पक्षाची याचा निकाल या निकालाने दिला आहे. मुंबई विभागात विधानसभेच्या एकूण 36 जागा आहे. त्यापैकी काही ठिकाणी शिवसेना (शिंदे) विरुद्ध शिवसेना (ठाकरे) अशीच लढत आहे. काही ठिकाणी भाजप विरुद्ध ठाकरे सेना लढत झाली. मनसेही निवडणूक मैदानात होती. आता मुंबईत नेमकी कोणाची ताकद सर्वाधिक आहे हे या निवडणुकीतून स्पष्ट झाले आहे.

मुंबईत भाजपचे वर्चस्व

मुंबईतील ३६ जागांपैकी १९ जागांवर भाजपने उमेदवार उभे केले होते. त्यात त्यांचे १५ उमेदवार विजयी झाले. उद्धव ठाकरे यांनी २२ जागा लढवल्या होत्या. त्यात १० जागांवर त्यांचे उमेदवार विजयी झाले. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने १४ जागी उमेदवार दिले होते. त्यांना ६ ठिकाणी यश आले. काँग्रेसला तीन, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला एक आणि समाजवादी पक्षाला एक जागा मिळाली. राज ठाकरे यांच्या मनसेला एकही जागा मिळाली नाही.

मुंबईतील विजयी उमेदवारांची यादी

भाजप

हे सुद्धा वाचा
  1.  कुलाबा -राहूल नार्वेकर
  2.  मलबार हिल-मंगलप्रभात लोढा
  3. वडाळा-कालीदास कोळंबकर
  4.  सायन कोळीवाडा -तमिळ सेल्वन
  5. बोरीवली-संजय उपाध्याय
  6. दहीसर-मनिषा चौधरी
  7. कांदिवली-अतुल भातखळकर
  8.  चारकोप-योगेश सागर
  9. गोरेगांव-विद्या ठाकूर
  10. अंधेरी पूर्व-अमित साटम
  11. मुलुंड-मिहिर कोटेचा
  12. घाटकोपर पश्चिम-राम कदम
  13. घाटकोपर पूर्व-पराग शहा
  14. विलेपार्ले-पराग अळवणी
  15. वांद्रे पश्चिम-आशिष शेलार

ठाकरे गट

  1. भायखळा-मनोज जामसुतकर
  2. शिवडी -अजय चौधरी
  3. वरळी -आदित्य ठाकरे
  4. माहीम – महेश सावंत
  5. जोगेश्वरी पूर्व-अनंत नर
  6. दिंडोशी-सुनील प्रभू
  7. वर्सोवा-हारूण खान
  8. कलिना-संजय पोतनीस
  9. वांद्रे पूर्व- वरूण सरदेसाई
  10. विक्रोळी-सुनील राऊत

काँग्रेस

  1. मुंबादेवी-अमिन पटेल
  2. धारावी-ज्योती गायकवाड
  3. मालाड-अस्लम शेख

शिंदे गट

  1. मागाठाणे- प्रकाश सुर्वे
  2.  भांडुप पश्चिम-अशोक पाटील
  3. अंधेरी पश्चिम-मुरजी पटेल
  4. चांदिवली-दिलीप लांडे
  5. कुर्ला-मंगेश कुडाळकर
  6. चेंबुर-तुकाराम काते

अजित पवार गट

अनुशक्तीनगर-सना मलिक-राष्ट्रवादी अजित पवार

समाजवादी पार्टी

मानखुर्द शिवाजीनगर-अबू आझमी-सपा