महाराष्ट्रात ऑक्सिजन अभावी एकही मृत्यू नसल्याचं प्रतिज्ञापत्र राज्य सरकारनेच दिले : केशव उपाध्ये

| Updated on: Jul 22, 2021 | 5:44 PM

ऑक्सिजन अभावी एकही मृत्यू झाला नसल्याची माहिती दिल्यानंतर देशभरातून सरकारवर सडकून टीका होत आहे. त्या पार्श्वभूमीवरच भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी या प्रकरणी चेंडू राज्य सरकारकडे टोलवला आहे.

महाराष्ट्रात ऑक्सिजन अभावी एकही मृत्यू नसल्याचं प्रतिज्ञापत्र राज्य सरकारनेच दिले : केशव उपाध्ये
भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Follow us on

मुंबई : ऑक्सिजन अभावी एकही मृत्यू झाला नसल्याची माहिती दिल्यानंतर देशभरातून सरकारवर सडकून टीका होत आहे. त्या पार्श्वभूमीवरच भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी या प्रकरणी चेंडू राज्य सरकारकडे टोलवला आहे. “महाराष्ट्रात ऑक्सिजन अभावी एकही मृत्यू झाला नसल्याचे प्रतिज्ञापत्र राज्य सरकारनेच न्यायालयात दिले आहे. त्यामुळे आघाडी सरकारचा खोटेपणा पुन्हा उघड झाला आहे,” असा आरोप केशव उपाध्ये यांनी केला. ते गुरुवारी (22 जुलै) भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

याआधी मुख्यमंत्री व आघाडी सरकारमधील काही मंत्री केंद्र सरकार ऑक्सीजनचा पुरेसा पुरवठा करत नसल्याचे आरोप करत होते. आता न्यायालयात दिलेल्या शपथपत्रामुळे या सरकारने आपल्या खोटेपणाची कबुली आहे, असंही उपाध्ये यांनी नमूद केलं.

“सरकारने पटोले यांच्या आरोपांबाबत तातडीने खुलासा करावा”

केशव उपाध्ये म्हणाले, “काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याच्या केलेल्या आरोपांबाबत काँग्रेसच्या पाठिंब्यावर सत्तेत असलेल्या आघाडी सरकारने अजून स्पष्टीकरण दिलेले नाही. राज्य सरकारने पटोले यांच्या आरोपांबाबत तातडीने खुलासा करावा व पटोले यांच्या आरोपांची चौकशी करावी”.

“लोकल प्रवासासाठी मुंबईकर जनताच सविनय नियमभंग करेल”

भाजप मुंबईतील लोकल सुरू करण्याच्या प्रश्नावर आक्रमक झाला आहे. मुंबईतील सामान्य नोकरदार, कष्टकऱ्यांना उपनगरी प्रवासाची परवानगी न देणाऱ्या ठाकरे सरकारला धडा शिकविण्यासाठी सामान्य मुंबईकर 2 ऑगस्टपासून सविनय नियमभंग करीत लोकल प्रवास सुरू करतील, असा इशाराच भाजप प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव

केशव उपाध्ये म्हणाले, “मुंबईतील प्रवासाच्या सुविधेबाबत ठाकरे सरकारकडे धोरण नसल्याने सामान्य माणसाचे अतोनात हाल होत आहेत. सामान्य माणसाला उपनगरी प्रवासास परवानगी देण्यास हरकत नसल्याचे केंद्र सरकारने 2 आठवड्यांपूर्वीच स्पष्ट केले आहे. असे असताना राज्य सरकार सामान्य माणसाला उपनगरी रेल्वे प्रवासास परवानगी देण्याच्या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष करीत आहे. टाळेबंदीबाबतच्या राज्य सरकारच्या धरसोडपणामुळे जनतेचे जगणे अगोदरच मुश्कील झाले आहे.”

“सामान्य माणसाला लोकल प्रवासास परवानगी द्या अन्यथा प्रवास खर्चापोटी 5 हजार रुपये भत्ता द्या या भाजपने केलेल्या मागणीकडे राज्य सरकारने दुर्लक्ष केले. वैतागलेला सामान्य माणूस आघाडी सरकारच्या निषेधार्थ मोफत लोकल प्रवास करून सविनय नियमभंग आंदोलन करेल,” असा इशारा उपाध्ये यांनी दिलाय.

हेही वाचा :

‘..मग संजय राऊत राज्य सरकारवरही खटला भरणार आहेत का?’ चित्रा वाघ यांचा राऊतांना खोचक सवाल

ऑक्सिजन अभावी एकाचाही मृत्यू नाही, सरकारच्या उत्तराने विरोधक भडकले; विषेशाधिकार भंगाचा प्रस्ताव आणणार

20 मीटर उंच, 125 मेट्रिक टन साठवणूक क्षमता, नागपुरात देशातील सर्वात मोठा ऑक्सिजन टॅंक

व्हिडीओ पाहा :

BJP Keshav Upadhye allegation on MVA government about Zero oxygen shortage death