राज ठाकरे माझ्यासाठी पाऊण तास उन्हात थांबले, पण उद्धव आले नाहीत; ‘तो’ किस्सा सांगताना आशिष शेलार भावूक

| Updated on: Aug 22, 2021 | 2:36 PM

माझी आई माझ्यासाठी सर्वस्व होती. आई गेल्यानंतर राज ठाकरे माझ्यासाठी पाऊण तास उन्हात थांबले. पण शिवसेनेच्या कार्यकारी प्रमुखांनी भेटणं तर सोडाच साधी संवेदनाही व्यक्त केली नाही. (bjp leader ashish shelar on friendship with raj thackeray)

राज ठाकरे माझ्यासाठी पाऊण तास उन्हात थांबले, पण उद्धव आले नाहीत; तो किस्सा सांगताना आशिष शेलार भावूक
ashish shelar
Follow us on

मुंबई: माझी आई माझ्यासाठी सर्वस्व होती. आई गेल्यानंतर राज ठाकरे माझ्यासाठी पाऊण तास उन्हात थांबले. पण शिवसेनेच्या कार्यकारी प्रमुखांनी भेटणं तर सोडाच साधी संवेदनाही व्यक्त केली नाही. अर्थात त्यांनी संवेदना व्यक्त करावी असा माझा आग्रह नाही, असं सांगताना भाजप नेते आशिष शेलार भावूक झाले होते. निमित्त होतं एका मुलाखतीचं. (bjp leader ashish shelar on friendship with raj thackeray)

आशिष शेलार यांनी ‘लोकमत’च्या ‘फेस-टू-फेस’ या कार्यक्रमात हा किस्सा सांगितला. यावेळी त्यांनी आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टींचा उलगडा केला. चाळीतून सुरू झालेलं बालपण ते पुनर्वसनामुळे विस्थापित व्हावं लागणं… त्यानंतर विद्यार्थी चळवळ ते भाजपमधील यशाची चढती कमान आधी बाबींवर शेलार यांनी प्रकाश टाकला. याचवेळी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबतच्या मैत्रीचे पदर उलगडतानाच व्यक्ती म्हणून राज ठाकरेंचं मोठेपणही अधोरेखित केलं. या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या आयुष्यातील एक किस्सा सांगत भावनेला वाटही मोकळी करून दिली.

राज यांच्याकडून शिकण्यासारखं खूप काही

राज ठाकरेंकडून शिकण्यासारख्या गोष्टी खूप आहेत. विद्यार्थी चळवळीत असताना आम्ही एकमेकांच्या विरोधात होतो. अर्थात राज ठाकरे राज ठाकरे होते. मी एक साधा कार्यकर्ता होतो. पण नंतर मी जसजसा काळानुसार प्रगती करत गेलो. तेव्हा राज यांच्याशी संवाद वाढला आणि त्यातून मैत्रीचं नातं निर्माण झालं. हे मैत्रीचं नातं करण्याचं श्रेय राज ठाकरेंकडेच आहे. आजही मी त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकत असतो. मैत्री अशी बदलली की त्यात सहजता आली, असं शेलार म्हणाले.

ते मी विसरणार नाही

माझी आई माझ्यासाठी सर्वस्व आहे. आई गेल्यानंतर राज ठाकरे अर्धा-पाऊण तास त्या उन्हात थांबले होते. मला तुलना करायची नाही. त्यातून अर्थही काढायचा नाही. पण त्यावेळेला त्या आठवडाभरात एकदा नाही दोनदा शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख रंग शारदाला आले होते. माझ्या घरापासून दोन मिनिटाच्या अंतरावर आले होते. पण ते घरी आले नाही. ती त्यांची मर्जी. त्यांनी फोनही केला नाही. एसएमएसही केला नाही. संवेदनाही व्यक्त केल्या नाहीत. माझ्या आईसाठी त्यांनी संवेदना व्यक्त केली पाहिजे असा माझा आग्रहही नाही. पण हे मी विसरणारही नाही, असं ते म्हणाले. (bjp leader ashish shelar on friendship with raj thackeray)

 

संबंधित बातम्या:

‘नारायण राणेंना पब्लिसिटी स्टंटचा मोह आवरला नाही, लोकांचं आरोग्य वेठीस धरलं’

Video: मिलिंद नार्वेकरांच्या दापोलीतल्या ‘त्या’ अलिशान बंगल्यावर अखेर जेसीबी, सोमय्या म्हणतात, करुन दाखवलं, पुढचा नंबर कुणाचा?

राणेंच्या ‘त्या’ विधानाचा एकनाथ शिंदेकडून समाचार; म्हणाले, त्यात तथ्य नाही, हा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न

(bjp leader ashish shelar on friendship with raj thackeray)