मुंबई : भाजप नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या (BJP leader Kirit Somaiya) मागील अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वी अर्थ या एनजीओवरदेखील गैरव्यवहाराचे आरोप केले आहेत. याच आरोपांबाबत सोमय्या यांना शिवडी न्यायालयाने समन्स बजावले असून येत्या 5 ऑक्टोबर रोजी त्यांना न्यायालयात हजर राहावे लागणार आहे. (BJP leader kirit Somaiya summoned by shivadi court on October 5 for allegations of irregularities on pravin kalme)
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी गृहनिर्माण विभाग, एसआरए तसेच म्हाडा या संस्थांमध्ये काम करणाऱ्या बिल्डरांकडून 100 कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश प्रवीण कलमे (Pravin Kalme) यांना दिले आहेत. प्रवीण कलमे हे या सरकारी संस्थांमधील सचिन वाझे आहेत, असे आरोप किरीट सोमय्या यांनी एप्रिल महिन्यात केले होते.
या आरोपांना आव्हान देत प्रवीण कलमे आणि अर्थ या स्वयंसेवी संस्थेने न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. ही याचिका दाखल करून घेण्यात आली असून त्यावर सुनावणी सुरु आहे. त्यामुळे सोमय्या यांना येणाऱ्या 22 सप्टेंबर आणि 5 ऑक्टोबर रोजी न्यायालयात हजेरी लावावी लागणार आहे. एवढेच नाही तर केलेले आरोप सिद्ध करण्यासाठी सोमय्या यांना खटाटोप करावा लागणार आहे.
सोमय्या यांनी महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप केले आहेत. मात्र, आता प्रविण कलमे यांनीसुद्धा सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मुकेश दोषी यांची क्रिस्टल प्राईड आणि आनंद पंडित यांची लोटस डेव्हलपर्स या दोन बिल्डरसाठी सोमय्या यांनी जिवाचं रान केलं आहे. आनंद पंडित हे किरीट सोमय्या यांच्या संस्थेत पदाधिकारी आहेत. आनंद पंडित यांच्याकडून सोमय्या यांच्या संस्थेला आर्थिक मदत येते, असा आरोप कलमे यांनी सोमय्या यांच्यावर केला आहे.
इतर बातम्या :
चीनच्या फुजियान प्रांतात डेल्टा वेरिएंटचा कहर, संपूर्ण शहर सील, चित्रपटगृह, शाळा, हायवे सगळं बंद
ऊर्जा विभागाला तारण्यासाठी ‘गुजरात मॉडेल’चा आधार घेणार?, आंतरराष्ट्रीय सल्लागार समितीही नेमणार; मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत निर्णय#UddhavThackeray #Energy #Maharashtrahttps://t.co/eO6pddnOXM
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 14, 2021
(BJP leader kirit Somaiya summoned by shivadi court on October 5 for allegations of irregularities on pravin kalme)