उद्याचा दसरा मेळावा हा कोणत्याही जातीचा, वर्गाचा नाही, हा डोंगर कपारीतील कष्टकऱ्यांचा मेळावा: पंकजा मुंडे

| Updated on: Oct 14, 2021 | 1:10 PM

बीडमध्ये उद्या होणारा दसरा मेळावा हा कोणत्याही जातीपातीचा नाही. कोणत्याही वर्गाचा नाही. हा डोंगर कपारीतील कष्टकऱ्यांचा, वंचितांचा मेळावा आहे. (bjp leader pankaja munde on dussehra melava in beed)

उद्याचा दसरा मेळावा हा कोणत्याही जातीचा, वर्गाचा नाही, हा डोंगर कपारीतील कष्टकऱ्यांचा मेळावा: पंकजा मुंडे
पंकजा मुंडे, भाजप नेत्या.
Follow us on

मुंबई: बीडमध्ये उद्या होणारा दसरा मेळावा हा कोणत्याही जातीपातीचा नाही. कोणत्याही वर्गाचा नाही. हा डोंगर कपारीतील कष्टकऱ्यांचा, वंचितांचा मेळावा आहे, असं सांगतानाच या मेळाव्याला येणारा कार्यकर्ता हा विचारांची ऊर्जा घेऊनच जातो, असं भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी सांगितलं.

उद्या बीड येथील भगवान गडावर दसरा मेळावा पार पडणार आहे. या मेळाव्याला पंकजा मुंडे या संबोधित करणार आहेत. या मेळाव्याच्या तयारीबाबत पंकजा मुंडे यांनी टीव्ही9 मराठीशी खास संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हे विधान केलं. दरवर्षी दसरा मेळावा आगळावेगळा असतो. हा मेळावा लोकांच्या आदेशावरून आणि आग्रहावरून होत असतो. यावेळचं स्वरूप किती सुंदर आणि देखणं आहे हे केवळ तिथे येणाऱ्या लोकांवर अवलंबून आहे. मला विश्वास आहे मेळावा आगळावेगळा असेल, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

राजकारणाचा मूलमंत्र

बीडमध्ये दसऱ्याला भगवान बाबांच्या भक्तीचा मेळा जमतो. दरवेळी हा व्हिडीओ उत्सफूर्तपणे येतो. हृदयातून निघालेला संवाद हृदयापर्यंत पोहोचतो. हीच खरी नेतृत्वाची ताकद असते. ही भक्तीची परंपरा आहे, ती नैसर्गिक आहे. लोकांनी मला आदेश द्यायचा आणि मी स्वीकारायचा हा माझ्या राजकारणाचा मूलमंत्र आहे. तुम्ही सांगायचं आणि मी करायचं… माझ्या मनात ही चार वाक्य आली आणि त्याचा व्हिडीओ झाला. लोकं खूप मोठ्या संख्येने तो व्हिडीओ बघत आहेत, असं त्या म्हणाल्या.

ते त्याच भूमीत स्फूरतं

हा मेळावा एक वेगळा कार्यक्रम आहे. देशभरातील मोठमोठ्या कार्यक्रमांचा विचार केला तर प्रत्येक कार्यक्रमांमागे काही तरी एक संकल्प असतो. तसा या मेळाव्यामागे संकल्प आहे. डोंगरकपारीत कष्ट करणाऱ्यांचा मेळावा आहे. बहुजन आणि वंचितांचा हा मेळावा आहे. या मेळाव्यात कोणत्या जातीच्या वर्गाचा मेळावा नाही. हा कष्ट कऱ्यांचा मेळावा आहे. गोपीनाथ मुंडे साहेबांनी दिलेला वसा आणि वारसा आहे. या मेळाव्यात जे बोललं जातं ते महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील लोकांसाठी असतं. मेळाव्याला येणारा कार्यकर्ताच असेल असं नाही. तो ऊर्जा घेण्यासाठी येतो. भगवानबाबांवर खरी भक्ती असणारा नेता आणि सामान्य माणूस मोठ्या उत्साहाने येतो. तिथे जे स्फूरतं ते त्याच भूमीत स्फूरतं, असंही त्यांनी सांगितलं.

 

संबंधित बातम्या:

तुम्ही कोणते टगे पोसत आहात ते पाहा; प्रीतम मुंडेंचा धनंजय मुंडेंवर घणाघाती हल्ला

पंकजा मुंडेंची तोफ भगवान गडावरून धडाडणार; पंकजा यांच्या निशाण्यावर कोण?; भागवत कराड मेळाव्याला उपस्थित राहणार?

..तर ओबीसी तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही, पंकजा मुंडेंचं आव्हान, टार्गेटवर ठाकरे सरकार

(bjp leader pankaja munde on dussehra melava in beed)