कोकणासाठी स्वतंत्र विकास महामंडळ स्थापन करा, भाजप नेत्याची मागणी

| Updated on: Mar 08, 2021 | 3:35 PM

कोकणाला संपूर्ण महाराष्ट्र विकास महामंडळातून वगळून कोकणासाठी स्वतंत्र विकास महामंडळ स्थापन करावं, अशी मागणी दरेकर यांनी केली आहे.

कोकणासाठी स्वतंत्र विकास महामंडळ स्थापन करा, भाजप नेत्याची मागणी
pravin darekar
Follow us on

मुंबई : राज्यात सध्या विदर्भ आणि मराठवाडा विकास महामंडळाच्या मुद्द्यावरुन राजकारण तापलं आहे. अशावेळी आता भाजपचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे कोकणासाठी एक मागणी केली आहे. कोकणाला संपूर्ण महाराष्ट्र विकास महामंडळातून वगळून कोकणासाठी स्वतंत्र विकास महामंडळ स्थापन करावं, अशी मागणी दरेकर यांनी केली आहे.(Praveen Darekar demands to set up an independent development corporation for Konkan)

‘..तर पुतणा मावशीचं प्रेम म्हणावं लागेल’

शिवसेनेला आजवर कोकणानं भरभरुन दिलं. मुख्यमंत्री स्वत: कोकणाचे आहेत. आता कोकणाला परत देण्याची वेळ आली आहे तर मुख्यमंत्र्यांनी ते आधी करावं. जर कोकणाला काही मिळालं नाही तर मग पुतणा मावशीचं प्रेम म्हणावं लागेल, असा खोचक टोला दरेकरांनी लगावला आहे. शिवसेना ही फक्त कोकण आणि मुंबईपुरतीच आहे, असंही दरेकर यांनी म्हटलंय.

नाणार प्रकल्पात मुख्यमंत्र्यांनी आडकाठी करु नये. जिथे कोकणाचा मोठा विकास होणार आहे. मोठा रोजगार उपलब्ध होणार असेल तर मग त्यात आपली भूमिका बदलावी, अशी मागणी दरेकर यांनी केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाणार प्रकल्पाला दिलेल्या पाठिंब्याचं स्वागतही दरेकर यांनी केलं आहे.

नाणार प्रकल्पासाठी शरद पवारांचा राज ठाकरेंना फोन

कोकणातील नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्प हा राज्याच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. हा प्रकल्प राज्याबाहेर जाऊन देऊ नका, असे पत्र मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी शरद पवार यांना पाठवले होते. हे पत्र वाचल्यानंतर शरद पवार यांनी राज ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केल्याचे समजते. या चर्चेदरम्यान शरद पवार यांनी आपल्या भूमिकेचे समर्थन केल्याची माहिती राज ठाकरे यांनी सोमवारी कृष्णकुंजवर जमलेल्या नाणार प्रकल्प समर्थकांना ही माहिती दिली. मी नाणार प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलेन, असे शरद पवार यांनी सांगितल्याचा खुलासाही राज यांनी केल्याचे समजते.

‘फायदा’ मिळवण्यासाठी भूमिका बदलली

नाणार प्रकल्पाला विरोध करुनही राजकीय फायदा न मिळाल्यामुळे आता ‘इतर फायदे’ पदरात पाडून घेण्यासाठी मनसेने आपली भूमिका बदलल्याचा आरोप कोकण रिफायनरी प्रकल्प विरोधी संघटनेने केला आहे. 2019 विधानसभा निवडणुकीत मनसे उमेदवार अविनाश सौंदळकर यांना 2014 पेक्षा कमी मते पडली,पूर्वीच्या प्रकल्पग्रस्त 14 गावातून तीन आकडीही मते मिळाली नाहीत. ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये तर मनसे नावालाही नव्हती. त्यामुळे आता नाणार परिसरातील राजकारणाला तिलांजली देऊन समर्थनाची भूमिका घेऊन अन्य काही फायदे होत असतील तर घ्यावेत, अशी मनसेच्या स्थानिक नेत्यांची भूमिका असल्याचा आरोप कोकण रिफायनरी प्रकल्प विरोधी संघटनेचे अध्यक्ष रामचंद्र भडेकर यांनी केला.

संबंधित बातम्या :

हिंमत असेल तर राज यांनी नाणारवासियांसमोर भूमिका मांडावी; शिवसेनेचं आव्हान

‘नाणार प्रकल्प’ हातातून गमावू नका, राज्याला परवडणार नाही; राज ठाकरेंचं उद्धव ठाकरे, शरद पवार, फडणवीसांना पत्रं

Praveen Darekar demands to set up an independent development corporation for Konkan