आतली बातमी, महाराष्ट्रात भाजपच्या तब्बल 12 खासदारांचं तिकीट कापलं जाणार?

| Updated on: Mar 08, 2024 | 7:06 PM

भाजपच्या विद्यमान खासदारांचीदेखील धाकधूक वाढवणारी बातमी समोर आली आहे. भाजपच्या नेतृत्वाकडून राज्यातील खासदारांचे अंतर्गत तीन सर्व्हे करण्यात आले. या सर्व्हेतून विद्यमान खासदारांची धाकधूक वाढवणारी माहिती समोर आली आहे.

आतली बातमी, महाराष्ट्रात भाजपच्या तब्बल 12 खासदारांचं तिकीट कापलं जाणार?
Follow us on

मुंबई | 8 मार्च 2024 : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या प्रचंड घडामोडी सुरु आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांच्या गोटात जागावाटपासाठी जोरदार हालचाली घडत आहेत. महायुतीत तर हालचालींना जबरदस्त वेग आला आहे. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीला गेले आहेत. दिल्लीत हे दोन्ही नेते भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत. या चर्चेत एकनाथ शिंदे आणि अजित पवार लोकसभेच्या सर्वाधिक जागा मिळवण्यात यश मिळवतात का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाजप महाराष्ट्रात 36 पेक्षा जास्त जागांवर निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे शिंदे गट आणि ठाकरे गटाची धाकधूक वाढल्याची चर्चा आहे. असं असताना आता आणखी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. भाजपच्या विद्यमान खासदारांचीदेखील धाकधूक वाढवणारी बातमी समोर आली आहे. भाजपच्या नेतृत्वाकडून राज्यातील खासदारांचे अंतर्गत तीन सर्व्हे करण्यात आले. या सर्व्हेतून डझनभर खासदारांचा स्ट्राईक रेट समाधानकारक नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. स्ट्राईक रेट चांगला नसलेल्या खासदारांचं तिकीट कापलं जाऊ शकतं का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातोय.

तिकीट का कापलं जाऊ शकतं?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपच्या डझनभर विद्यमान खासदारांची तिकिटं कापलं जाण्याची शक्यता आहे. सामाजिक समीकरणांसह स्थानिक पातळीवरील राजकारणदेखील या सर्व्हेत पाहण्यात आलं. काही विद्यमान खासदारांबाबत लोकांमध्ये असलेली नाराजी या सर्व्हेमधून समोर आली आहे. निवडून येण्याची हमी असलेल्या मजबूत उमेदवारांची आवश्यकता असल्याचं आता समोर येत आहे. 3 पेक्षा अधिक वेळा निवडून आल्याने काहींच्या तिकीटाबाबत आक्षेप घेण्यात आलाय.

कोणत्या जागांवर उमेदवार बदलण्याची शक्यता?

  • प्रीतम मुंडे, बीड
  • सुभाष भामरे, धुळे
  • सिद्धेश्वर स्वामी, सोलापूर
  • संजय काका पाटील, सांगली
  • सुधाकर श्रृंगारे, लातूर
  • उन्मेश पाटील, जळगाव
  • गोपाळ शेट्टी, उत्तर मुंबई
  • पुनम महाजन, उत्तर मध्य मुंबई
  • प्रताप चिखलीकर, नांदेड
  • सुजय विखे पाटील, अहमदनगर
  • रामदास तडस, वर्धा
  • रक्षा खडसे, रावेर