मुंबई : भाजपा आमदार मनिषा चौधरी या दहिसरमध्ये धरणे आंदोलनावर बसल्या आहेत (Manisha Chaudhary On Dharne Protest). दहिसर महानगर पालिकेच्या आर/उत्तर विभाग आणि प्रभाग क्रमांक 1 चे नगरसेवक तेजस्वी घोसाळकर यांच्या विरोधात मनिष चौधरी या आर/उत्तर मनपा कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करत आहेत (Manisha Chaudhary On Dharne Protest).
गणपत पाटील नगर येथील स्थानिक नगरसेवक तेजस्वी घोसाळकर यांनी झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांची वीज कापण्यासाठी बीएमसीला पत्र लिहिले, असा आरोप अमादार मनिषा चौधरी यांनी केला.
यापूर्वी गणपत पाटील नगर भागात वीज नसल्याने अधिक गुन्हे होत होते. वीज माफिया एक बल्बचे 400 रुपये आणि ट्यूबलाईटचे 600 रुपये घेत होते. आता मीटर बसवल्यामुळे वीज माफियांनी मिळकत बंद केली. म्हणून आता तेथील नगरसेवकांनी लोकांच्या घरांचे मीटर कापण्यासाठी मनपाला पत्र लिहिले आहे, असा आरोप मनिषा चौधरी यांनी केला आहे.
याविरोधात मनिषा चौथरी भाजपच्या महिला मोर्चासह धरणे आंदोलनावर बसल्या आहेत. यावेळी महिला कार्यकर्त्यांनी शिवसेना नगरसेविकेविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली.
‘काँग्रेसला विरोधक लागत नाही’, निलेश राणेंचा टोला https://t.co/e4ZUJyPf7h @meNeeleshNRane @NiteshNRane @BJP4Maharashtra @bb_thorat @INCMaharashtra #Congress #BJP #BMC
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 22, 2020
Manisha Chaudhary On Dharne Protest
संबंधित बातम्या :
काही उद्योगपतींच्या फायद्यासाठी केंद्र सरकारचं काम: छगन भुजबळ
Night Curfew: हॉटेल व्यावसायिकांनंतर व्यापारी आक्रमक, नाईट कर्फ्यूला विरोध