औरंगाबादच्या नामांतराची प्रत्यक्ष वेळ येताच सेनेची नेहमीच माघार; भाजपचा गंभीर आरोप

| Updated on: Jan 05, 2021 | 2:35 PM

जेव्हा जेव्हा औरंगाबादच्या नामांतराची प्रत्यक्ष वेळ आली तेव्हा शिवसेनेने कच खाल्ली. त्यांची वृत्ती औरंगजेबासारखी दिसून आली, असा गंभीर आरोप भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आज केला. (bjp slams shivsena over aurangabad renamed as sambhajinagar)

औरंगाबादच्या नामांतराची प्रत्यक्ष वेळ येताच सेनेची नेहमीच माघार; भाजपचा गंभीर आरोप
केशव उपाध्ये, मुख्य प्रवक्ते, भाजप
Follow us on

मुंबई: औरंगाबादचं नामांतर करण्यासाठी भाजपने 1995 पासून चार प्रस्ताव औरंगाबाद पालिकेत दिले. स्मरणपत्रेही दिले. पण शिवसेनेने त्याकडे दुर्लक्ष केलं, असं सांगतानाच जेव्हा जेव्हा औरंगाबादच्या नामांतराची प्रत्यक्ष वेळ आली तेव्हा शिवसेनेने कच खाल्ली. त्यांची वृत्ती औरंगजेबासारखी दिसून आली, असा गंभीर आरोप भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आज केला. (bjp slams shivsena over aurangabad renamed as sambhajinagar)

केशव उपाध्ये यांनी आज पत्रकार परिषद घेऊन औरंगाबादच्या नामांतरावरून शिवसेनेची पोलखोल केली. औरंगाबादचं नामांतर संभाजी नगर करण्यासाठी आम्ही 1995मध्ये महापालिकेत प्रस्ताव दिला होता. युतीच्या काळात या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली होती. मात्र, राज्यात सत्तांतर झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि नंतर पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारने नामांतराचा प्रस्ताव बाजूला केला. काँग्रेस-राष्ट्रवादीने एकदा नव्हे तर दोनदा नामांतराचा प्रस्ताव फेटाळला, त्याच काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आज शिवसेना मांडीला मांडी लावून बसली आहे, अशी टीका उपाध्ये यांनी केली.

चार वेळा नामांतराचा प्रस्ताव दिला

भाजपने औरंगाबाद पालिकेत चार वेळा नामांतराचा प्रस्ताव दिला आहे. पण शिवसेनेने हा प्रस्ताव दाखल करून घेतला नाही. तसेच बोर्डावरही हा प्रस्ताव आणला नाही, असा गंभीर आरोप करतानाच भाजपचे तत्कालीन नगरसेवक राजू शिंदे यांनी महापौरांना स्मरणपत्रं लिहिले असता वारंवार स्मरण पत्रं लिहू नये, असं महापौरांनी इतिवृत्तात म्हटल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला. औरंगाबादच्या नामांतराचं शिवसेनेच्या मनात होतं तर प्रस्ताव पुढे का आला नाही? असा सवालही त्यांनी केला.

फडणवीसांनी प्रयत्न केले

औरंगाबादच्या विषयात शिवसेनेची भाषा ही औरंगजेबासारखी आहे. शिवसेना ही औरंगजेबाची सेना झाली आहे. ते बोलतात एक आणि करतात वेगळच. जेव्हा जेव्हा नामांतराची संधी चालून आली तेव्हा तेव्हा शिवसेनेने माघार घेतली. औरंगाबादच्या नामांतराकडे साफ दुर्लक्ष केलं, असा गंभीर आरोप करतानाच आता निवडणुका असल्यानेच शिवसेना नामांतराचा विषय उकरून काढत असून शिवसेनेचं हे मतांचं राजकारण असल्याचा दावाही त्यांनी केला. तसेच देवेंद्र फडणवीस सरकारने नामांतराचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला होता. त्याचे पुरावे आपल्याकडे असल्याचा दावाही त्यांनी केला. (bjp slams shivsena over aurangabad renamed as sambhajinagar)

 

संबंधित बातम्या:

LIVE | औरंगाबाद नामांतरावरुन भाजपची पत्रकार परिषद, सेनेवर हल्लाबोल

नितेश राणेंचा महाविकास आघाडीला धक्का, देवगडमधील ग्रामपंचायत बिनविरोध भाजपकडे

भाजपकडून कोरोना महामारीचा राजकीय वापर, काँग्रेसचा गंभीर आरोप

(bjp slams shivsena over aurangabad renamed as sambhajinagar)