MLC Election 2022 : भाजपाची पाचवी जागा इतरांपेक्षा जास्त मताधिक्यानं निवडून येईल, अजित पवारांच्या भेटीनंतर बावनकुळेंचा ठोकून दावा

| Updated on: Jun 20, 2022 | 2:30 PM

विधान परिषद निवडणुकीच्या धामधुमीत भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटले. ऐन निवडणुकीच्या काळात भेटण्याचे कारण मात्र त्यांनी वेगळेच सांगितले.

MLC Election 2022 : भाजपाची पाचवी जागा इतरांपेक्षा जास्त मताधिक्यानं निवडून येईल, अजित पवारांच्या भेटीनंतर बावनकुळेंचा ठोकून दावा
लोकसभेला 400 जागा जिंकण्याचं टार्गेट, जे. पी नड्डा बरोबरच बोलले, चंद्रशेखर बावनकुळे आणखी काय म्हणाले?
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : एक लाख टक्के दावा आहे, विधान परिषद निवडणुकीत (Vidhan Parishad Election) भाजपाचा उमेदवार निवडून येईल. भाजपाची पाचवी जागा इतरांपेक्षा जास्त मताधिक्याने निवडून येईल, असा दावा भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bavankule) यांनी केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीनंतर त्यांनी हा दावा केला आहे. दहा उमेदवारांमधून आमचा उमेदवार सर्वात जास्त मतांनी निवडून येईल. तर राज्यसभेपेक्षा हा मोठा विजय असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. कोणाचा उमेदवार पडणार, या प्रश्नावर ते म्हणाले, की हे मतमोजणीच ठरवेल. मात्र उमेदवार तर भाजपाचाच निवडून येईल, असा दावा त्यांनी हसतमुखाने केला आहे. विशेष म्हणजे ते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या भेटीला गेले होते. त्यानंतर त्यांनी हा दावा केला आहे.

अजित पवारांची घेतली भेट

विधान परिषद निवडणुकीच्या धामधुमीत भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटले. ऐन निवडणुकीच्या काळात भेटण्याचे कारण मात्र त्यांनी वेगळेच सांगितले. नागपूरच्या कामासाठी अजित पवार यांना भेटल्याचे त्यांनी सांगत पत्रकारांचा प्रश्न टोलवला. तर मतदान आता झाले आहे. नागपूरचे काम होते. त्यासंदर्भात त्यांना भेटल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा

बंद दाराआड चर्चा?

विधान परिषद निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने प्रत्येकी दोन उमेदवार दिलेले आहेत. भाजपाकडून पाच उमेदवार आहेत. विधान परिषदेच्या दहा जागांसाठी आजची निवडणूक होत आहे. तर भाजपाने एक अतिरिक्त उमेदवार दिल्याने ही निवडणूक चुरशीची होत आहे. राष्ट्रवादी आणि भाजपाच्या उमेदवारांनी सर्वात आधी तर त्यानंतर काँग्रेस आणि शिवसेनेच्या आमदारांनी मतदान केले. मात्र मतदान सुरू असतानाच चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवारांची भेट घेतली. या ठिकाणी एकनाथ खडसेदेखील उपस्थित होते. त्यामुळे या तिघांमध्ये काय चर्चा झाली, याची बाहेर चर्चा रंगली होती. सरकार वाचवण्यासाठी शिवसेना आपल्या मावळ्याचा बळी देण्याच्या तयारीत आहे, असे विधान भाजपाचे खासदार अनिल बोंडे यांनी केले होते. त्यानंतर काही तासांतच बावनकुळे यांनी अजित पवार यांची भेट घेतली. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.