मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, ‘या’ भागांमध्ये पाणी पुरवठा राहणार बंद

| Updated on: May 23, 2024 | 9:59 PM

रेसकोर्स आवारातील १२०० मिलिमीटर व्यासाच्या बटरफ्लाय व्हॉल्व्हच्या दुरुस्ती कामामुळे जी दक्षिण विभागातील बीडीडी चाळ, डिलाईल मार्ग, करी रोड आणि लोअर परळ भागाचा शुक्रवार, २४ मे २०२४ रोजी पहाटे ४.३० ते सकाळी ७.३० या तीन तास कालावधीतील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. नागरिकांनी पाणी जपून आणि काटकसरीने वापरण्याचे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे.

मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, या भागांमध्ये पाणी पुरवठा राहणार बंद
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, 'या' भागांमध्ये पाणी पुरवठा राहणार बंद
Follow us on

महालक्ष्मी रेसकोर्स आवारातील १२०० मिलिमीटर व्यासाच्या बटरफ्लाय व्हॉल्व्हला काल बुधवारी (दिनांक २२ मे २०२४) रात्री मोठ्या प्रमाणात गळती लागल्याचे निदर्शनास आलं आहे. मुंबई महानगरपालिका जल अभियंता विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अहोरात्र कार्यरत राहून ही गळती थोपवून धरली आणि पाणीपुरवठा तात्पुरत्या स्वरूपात सुरळीत केला आहे. त्यामुळे जी दक्षिण आणि जी उत्तर विभागात आज गुरुवार, दिनांक २३ मे २०२४ रोजी दुपारी आणि सायंकाळी नियमित वेळेत पाणीपुरवठा केला जाणार आहे.

मात्र, या गळती दुरुस्तीचे काम आज (२३ मे २०२४) रात्री १० वाजता हाती घेण्यात येणार आहे. सदर काम उद्या दुपारपर्यंत पूर्ण होईल. परिणामी, उद्या शुक्रवार, २४ मे २०२४ रोजी जी दक्षिण विभागातील बीडीडी चाळ, डिलाईल मार्ग, करी रोड आणि लोअर परळ भागाचा पहाटे ४.३० ते सकाळी ७.३० दरम्यानचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. संबंधित विभागातील नागरिकांनी कृपया पाणी जपून आणि काटकसरीने वापरावे, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.

रेसकोर्स आवारातील बटरफ्लाय व्हॉल्व्हच्या टेलपीस सॉकेट जॉइंटमधून २२ मे २०२४ रोजी रात्री मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याचे आढळले. खालच्या बाजूचा लीड जॉइंट पूर्णपणे बाहेर आल्याचे निदर्शनास आले. जल अभियंता विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत त्याची पाहणी केली. सदर व्हॉल्व्ह दुरुस्तीचे काम आज (२३ मे २०२४) रात्री युद्ध पातळीवर हाती घेण्यात येत आहे. त्यापूर्वी, जी दक्षिण आणि जी उत्तर विभागात आज दुपारी आणि सायंकाळी नियमित वेळेत पाणीपुरवठा करण्यात आला आहे.

पाणीपुरवठा नियमित आणि पुरेशा दाबाने होण्यासाठी व्हॉल्व्ह दुरुस्ती करणे आवश्यक आहे. त्यानुसार गळती दुरुस्तीचे काम आज दिनांक २३ मे २०२४ रोजी रात्री १० वाजता हाती घेण्यात येणार आहे. पाण्याच्या उच्च दाबामुळे व्हॉल्वच्या सांध्यामध्ये शिसे (लीड जॉइंट) ओतणे शक्य नाही. त्यासाठी जलवाहिनीचे अलगीकरण केले जाणार आहे. सदर काम उद्या दुपारपर्यंत पूर्ण होईल.परिणामी शुक्रवार, दिनांक २४ मे २०२४ रोजी जी दक्षिण विभागातील बीडीडी चाळ,डिलाईल मार्ग, करी रोड आणि लोअर परळ भागाला पहाटे ४.३० ते सकाळी ७.३० या वेळेत नियमित दिला जाणारा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.

संबंधित परिसरातील नागरिकांनी कृपया पाणी जपून आणि काटकसरीने वापरावे, बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्‍यात येत आहे.