मुंबईत आता घरोघरी जाऊन लसीकरण?; पालिकेने मागितली राज्यसरकारकडे परवानगी

| Updated on: Mar 30, 2021 | 3:29 PM

मुंबईत कोरोनाचा संसर्ग वाढल्याने कोरोना रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने कठोर उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. (BMC Commissioner Iqbal Singh Chahal takes jab of COVID-19 vaccine)

मुंबईत आता घरोघरी जाऊन लसीकरण?; पालिकेने मागितली राज्यसरकारकडे परवानगी
Iqbal singh Chahal
Follow us on

मुंबई: मुंबईत कोरोनाचा संसर्ग वाढल्याने कोरोना रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने कठोर उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुंबईत काही लोकांसाठी घरोघरी जाऊन लसीकरण करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला असून या लसीकरणासाठी राज्य सरकारकडे परवानगी मागितली आहे. मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी याबाबतची माहिती दिली. (BMC Commissioner Iqbal Singh Chahal takes jab of COVID-19 vaccine)

पालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी वांद्रे कुर्ला संकुतल येथील जम्बो कोविड सेंटरमध्ये जाऊन लस घेतली. त्यानंतर मीडियाशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. मुंबईत लसीकरण सुरू आहे. पहिल्या टप्प्यात 16 जानेवारीपासून हेल्थ केअर वर्कर्स आणि नंतर 4 एप्रिल रोजी फ्रंटलाईन वर्कर्सना आणि मग इतरांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. आतापर्यंत दहा लाखांवर लसीकरण करण्यात आलं आहे. वांद्रे-कुर्ला संकुलमधील जम्बो कोविड सेंटर हे देशातील सर्वात मोठं लसीकरण केंद्र आहे. आपण मुंबईत दिवसाला 40 हजार लसीकरण करतो. हा आकडा लवकरच एक लाखावर नेण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे. त्यासाठी खासगी रुग्णालयांना लसीकरणाची परवानगी देण्याची केंद्राला विनंती करण्यात आल्याचं चहल यांनी सांगितलं.

राज्य सरकार केंद्राला विनंती करणार

खासगी रुग्णालयांना लसीकरणाची परवानगी दिली तर मुंबईत अतिरिक्त 13 हजार लसीकरण होऊ शकेल. मुंबईत सध्या 59 अतिरिक्त रुग्णालयेत आहेत. प्रत्येक 35 रुग्णालयात प्रत्येकी 1000 लसीकरण केल्यास आणि छोट्या रुग्णालयांनी 500 लसीकरण केल्यास लसीकरणाचा वेग वाढेल, असं सांगतानाच आपल्याकडील रिपोर्टनुसार काही लोकांना दारोदारी लसीकरण करण्याची परवानगी सरकारकडे केली आहे. त्यावर लवकरच निर्णय होईल. त्यामुळे लसीकरणाचा वेग वाढेल. याबाबत राज्य सरकार केंद्राकडे मागणी करेल. तसेच मी स्वत: केंद्राच्या टीमकडे ही विनंती केली आहे, असंही त्यांनी सांगितलं.

69,500 रुग्णांना लक्षणे नसलेले

मुंबईत 10 फेब्रुवारीपासून कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली आहे. 48 दिवसात 85 हजार कोरोना रुग्ण सापडले आहेत. त्यात 69,500 रुग्णांना लक्षणे नव्हती. इतरांना लक्षणे होती. 10 फेब्रुवारी रोजी 3500 खाटा भरल्या होत्या. त्यानंतर काल रात्री 9900 खाटा भरल्या गेल्या. येत्या 14 दिवसात ही साखळी सुरू होईल. जुन्या रुग्णांना डिस्चार्ज मिळेल आणि नवे रुग्ण अॅडमिट होतील. त्यामुळे 8 ते 10 हजार खाटा पुरेशा होतील, असं सांगतानाच 2400 खाटा खासगी रुग्णालयात ठेवण्यात आल्या आहेत. त्या वाढवून 4900 करण्यात येणार आहेत. एक हजार खाटा नेस्को, दीड हजार खाटा बीकेसी आणि 2200 खाटा खासगी रुग्णालयांच्या मिळून 7000 हजार रिकाम्या खाटा तयार आहेत. इतर व्यवस्थाही आपण वाढवणार आहोत, असं ते म्हणाले. तसेच 9 हजार खाटा जम्बो कोविड सेंटरमध्ये असतील. या ठिकाणी नवीन खाटा न वाढवता काम होणार आहे, असं त्यांनी सांगितलं.

लॉकडाऊन मुंबईकरांच्या हातात

मुंबईकरांनी व्यवस्थित नियम पाळले नाही आणि अशीच गर्दी होत राहिली, मार्केट आणि शॉपिंग सेंटरमधील गर्दी वाढतच राहिली तर सरकारला लॉकडाऊनचा नाईलाजाने विचार करावा लागेल. लॉकडाऊन करावा की करू नये हे सर्वस्वी लोकांच्या हातात आहे. लोकांनी ते ठरवायचे आहे, असं सांगतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही परिस्थिती आवाक्याबाहेर गेली तर लॉकडाऊन करावा लागेल असा इशारा दिला आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

समूह संसर्ग भयंकर

समूह संसर्ग हा ऑल ओव्हर द वर्ल्ड आहे. हा जो नवीन व्हायरसचा म्युटंट आहे तो फार इन्फेक्शियस आहे. हा व्हायरस खूप लवकर स्प्रेड होतो, म्हणजे एखाद्या कुटुंबात एका व्यक्तीला संसर्ग झाला तर तर तो सर्वांना होतो. आधी असं होत नव्हतं. यासाठी आयसोलेशन गरजेचे आहे आणि एखाद्या कुटुंबामध्ये एखादा व्यक्ती पॉझिटिव्ह आला तरी त्याने स्वतःला आयसोलेट केलं पाहिजे. मुख्यमंत्री वारंवार बोलतात जे निम्मे लोक असिम्प्टोमॅटिक येतात हे चांगलं सुद्धा आहे आणि वाईट सुद्धा आहे. चांगलं यासाठी की आपल्याला हॉस्पिटलवर लोड येत नाही. तर मला कोरोना झाला नाही, अशा अविर्भावात हे लोक बाहेर फिरतात आणि सर्वांना कोरोनाची लागण करतात हे वाईट आहे. म्हणून आम्ही त्यांना शिक्के मारतो आहे, असं सांगतानाच लोकांना जबाबदारीचं भान पाहिजे, असंही ते म्हणाले. (BMC Commissioner Iqbal Singh Chahal takes jab of COVID-19 vaccine)

 

संबंधित बातम्या:

Corona Cases and Lockdown News LIVE : येवल्यात दोन कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू

लॉकडाऊनवरुन बेबनाव सुरुच, आधी टोपे म्हणाले, माणसं महत्त्वाची, आता पटेल म्हणतात, लॉकडाऊन पर्याय नाही

Breaking | मुंबईतील कोरोना स्थितीचा मुख्यमंत्री घेणार आढावा

(BMC Commissioner Iqbal Singh Chahal takes jab of COVID-19 vaccine)