मुंबई : राज्यात मिशीन बिगेन अंतर्गत अनलॉकची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईत सणांच्या दिवशी पूर्वीप्रमाणे गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर आता पालिकेच्या दवाखान्यातही कोरोना चाचणी करण्यास परवानगी दिली आहे. (BMC Give Permission for Corona test in municipal hospital)
कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईत कोरोनाचे रुग्ण आटोक्यात येत असल्याचे बोललं जात आहे. मात्र आता गणेशोत्सवाप्रमाणेच दिवाळीनिमित्त बाजारपेठांमध्ये गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ही बाब लक्षात घेता भविष्यात सर्वसामान्य नागरिकांना कोरोनाची चाचणी सहज करता येणं शक्य व्हावी, यासाठी मुंबई महापालिकेने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यानुसार मुंबईतील पालिकेच्या दवाखान्यातही कोरोना चाचणी करता येणार आहे.
मुंबईमध्ये ठिकठिकाणी पालिकेचे 175 दवाखाने आहेत. यापैकी काही दवाखान्यांमध्ये पालिका विनाशुल्क कोरोना चाचणीची सुविधा उपलब्ध करण्याची शक्यता आहे. तसेच प्रत्येक विभाग कार्यालयाच्या हद्दीतील साधारण पाच दवाखान्यांमध्ये कोरोना चाचणी करता येणार आहे, असेही पालिका प्रशासननाने सांगितले आहे. (BMC Give Permission for Corona test in municipal hospital)
संबंधित बातम्या :
मुंबईत कोरोना रुग्ण दुप्पटीचा कालावधी वाढला, तब्बल 10 दिवसात दीडशे पार
पालिका कर्मचाऱ्यांना 15 हजार बोनस?, सोमवारी बोनस जाहीर होणार; मुख्यमंत्र्यांसोबतची चर्चा यशस्वी