मुंबई : कोरोना परिस्थिती नियंत्रणात आल्याने राज्य सरकारने 5 वी ते 8 वी इयत्तेची शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षण विभागाच्या बैठकीत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबतची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिली. राज्यातील 5 ते 8 वीच्या शाळा प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत 27 जानेवारीपासून सुरू होतील, अशी माहिती त्यांनी दिली. राज्यातील शाळा उघडण्याबाबत वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांना माहिती दिली असली तरी मुंबईतील शाळा पुढील आदेशापर्यंत सुरु होणार नाहीत, अशी माहिती मुंबई महापालिकेने प्रसिद्धी पत्रक जारी करत सांगितली आहे (BMC on school reopen).
मुंबईतील सर्व सरकारी आणि खासगी शाळा 15 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्यात आल्या होत्या. मुंबई महापालिका क्षेत्रातील कोरोना स्थिती नियंत्रणात असली तरीही अन्य देशांमध्ये कोरोनाची असलेली दुसरी लाट आणि अन्य राज्यातील कोरोना परिस्थिती पाहता मुंबई महापालिकेतील सर्व खासगी आणि सरकारी शाळा 16 जानेवारी 2021 पर्यंत पुढील आदेश मिळेपर्यंत बंद ठेवण्यात येतील, असं मुंबई महापालिकेने जाहीर केलं आहे (BMC on school reopen).
आम्ही स्थानिक पातळीवर निर्णय घेऊ : महापौर
दरम्यान, शाळा सुरु करण्याबाबत महापौर किशोरी पेडणेकर यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. “लगेच 27 जानेवारीपासून शाळा सुरू होतील की नाही, याबाबत माझ्या मनात शंका आहे. आम्ही स्थानिक पातळीवर निर्णय घेऊ, पालक आणि आयुक्तांशी बोलून निर्णय घेऊ. पालकांची रजाबंदी महत्त्वाची आहे. कोरोना संकट कमी झालं पण संपलं नाही. मुंबईत अनेक दाटीवाटीने घरं आहेत”, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
“राज्य सरकारने आज परवानगी दिली. पण 27 तारखेपर्यंत नियोजन होणं अशक्य. शिवाय शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्याचा त्या त्या जिल्ह्याला अधिकार देण्यात आला आहे. आम्ही सोमवारपर्यंत निर्णय घेऊ”, असं त्यांनी सांगितलं.
दिवसभराची बित्तंबात, पाहा आजची बात, #TV9Marathi वर दररोज रात्री 10 वा
“काही शाळांमध्ये क्वॉरंटाईन सेंटर उघडले होते. पण त्यात पेशंट गेले नव्हते. पण तरीही शाळा सॅनिटाईज करणं वगैरे, त्यात वेळ जाईल”, असंदेखील मत त्यांनी मांडलं.
“पालिकेत सर्व गटनेत्यांची बैठक होईल त्यात निर्णय .पण सध्याच्या वेळात आपण धस्तावलेलो आहे. आम्हाला सर्वांना विचारात घेऊन निर्णय घ्यायचा आहे. सर्वांशी चर्चा करून जो निष्कर्ष येईल त्यावरून पुढे जाऊ. विद्यार्थ्यांच्या जीवाचा विचार करूनच निर्णय होईल”, अशी भूमिका किशोरी पेडणेकर यांनी मांडली.
संबंधित बातमी :
राज्यातील शाळा याच महिन्यात सुरु होणार, शिक्षणमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना तारीख सांगितली