मुंबई : मुंबईतील चेंबूर येथे मोठी दुर्घटना घडली आहे. मुंबई महापालिकेची पाईपलाईन दुरुस्ती करताना विजेचा शॉक लागून दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. गणेश उगले (45), अमोल काळे (40) असे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांचं नाव आहे. (BMC Water department 2 labour died during pipeline repairing work)
मिळाेलल्या माहितीनुसार, चेंबूरमधील सुमन नगर येथे पालिकेच्या जलवाहिनीचं दुरुस्ती काम सुरु आहे. सकाळी 8 च्या सुमारास पाणीखात्याचे कर्मचारी खड्ड्यात उतरुन ती जलवाहिनी दुरुस्ती करत होते. ही पाईपलाईन दुरुस्त करत असताना पालिकेच्या दोन कर्मचाऱ्यांना विजेचा शॉक लागला. त्यामुळे दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला.
हा शॉक इतका जबरदस्त होता की, खड्ड्यात काम करणारे सात कर्मचारी खड्ड्यातून बाहेर उडाले. यामुळे ते कर्मचारी जखमी झाले. सध्या जखमींवर उपचार सुरु आहेत. दरम्यान मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आला आहे.
1) गणेश उगले (45) – मृत्यू
2)अमोल काळे (40)– मृत्यू
3) नाना पुकाले (41) – जखमी
4) महेश जाधव (40)- जखमी
5) नरेश अधंगले (40) – जखमी
6) राकेश जाधव (39) – जखमी
7) अनिल चव्हाण (43)- जखमी (BMC Water department 2 labour died during pipeline repairing work)
संबंधित बातम्या :