मुंबई: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांबरोबरच मुंबईत अत्यवस्थ रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. त्यामुळे मुंबईत एक हजार ऑक्सिजन बेड, 100 आयसीयू आणि 100 व्हेंटिलेटर वाढविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे मुंबई महापालिका येत्या आठवड्याभरातच ही यंत्रणा उभी करणार आहे. (bmc will increase 1 thousand beds in mumbai)
मुंबई महापालिकेने कोरोनाला रोखण्यासाठी कंबर कसली आहे. त्याचाच एक भाग म्हणून येत्या आठ दिवसात मुंबईत एक हजार ऑक्सिजन बेड, 100 आयसीयू आणि 100 व्हेंटिलेटर वाढविण्यात येणार आहे. त्याशिवाय भायखळा येथील रिचर्डस्न अॅण्ड क्रुडास जम्बो कोविड सेंटरमध्ये एक हजार ऑक्सिजन बेड सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी ही माहिती दिली.
हजारावर अत्यवस्थ रुग्ण
मुंबईत ऑक्सिजन बेडची मागणीही वाढली आहे. त्यामुळे पालिकेने तातडीने बेड वाढवावेत अशी मागणी केली जात होती. त्यामुळे हे बेड्स वाढविण्यात येत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सुरुवातीच्या दिवसांत रुग्णांना कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. त्यामुळे रुग्णांचे प्रकृतीकडे दुर्लक्ष होते. मात्र यामुळे फुप्फुसात कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याने शरीराला ऑक्सिजन पुरवठा होण्यात अडथळे येतात. त्यामुळे प्रकृती अत्यवस्थ होण्याचे प्रमाण वाढले आहे. सद्यस्थितीत मुंबईत 1427 अत्यवस्थ रुग्ण असल्यानेच ऑक्सिजन बेड, आयसीयू, व्हेंटिलेटरची मागणी वाढत असल्यामुळे असे बेड वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
किती बेड रिक्त
मुंबईत फक्त 51 आयसीयू, 19 व्हेंटिलेटर रिक्त आहेत. पालिकेकडे एकूण 11,124 ऑक्सिजन बेड आहेत. यातील 10,028 बेडवर रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर 1096 बेड रिक्त आहेत. जम्बो सेंटर आणि विविध रुग्णालयांत 2849 आयसीयू बेड आहेत. यामधील 2798 बेडवर रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर केवळ 51 बेड रिक्त आहेत. मुंबईतील एकूण 1451 व्हेंटिलेटर बेडपैकी 1432 बेडवर रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर केवळ 19 बेड रिक्त आहेत, अशी माहितीही पालिकेकडून देण्यात आली आहे.
24 तासात 895 कोरोना बळी
दरम्यान, राज्यात गेल्या 24 तासांत तब्बल 895 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 66358 नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. तसेच 67752 कोरोनाबाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात सध्या एकूण 672434 सक्रीय रुग्ण असून राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 83.21 टक्के आहे. (bmc will increase 1 thousand beds in mumbai)
VIDEO | सुपरफास्ट 100 न्यूज | 100 SuperFast News | 8 AM | 29 April 2021 https://t.co/9r9Gxkx25A #MorningBulletin | #MorningHeadlines | #TV9Marathi | #BreakingNews | #LatestUpdates
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 29, 2021
संबंधित बातम्या:
कोरोना महामारी राष्ट्रीय आपत्ती जाहीर करा; संजय राऊत यांची मागणी
राज्यात कोरोना मृत्यूचं थैमान, पुणे महापालिकेत सर्वाधिक मृत्यू, गेल्या 5 दिवसातील आकडेवारी काय?
(bmc will increase 1 thousand beds in mumbai)