यंदा ख्रिसमस आणि न्यू ईयरच्या सेलिब्रेशनला ब्रेक?; मुंबई महापालिका जारी करणार नवी नियमावली

| Updated on: Dec 15, 2020 | 7:30 PM

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा पहिल्यांदाच ख्रिसमस आणि न्यू ईयरच्या सेलिब्रेशनला ब्रेक लागण्याची शक्यता आहे. (bmc will issue new guidelines for new year celebrations)

यंदा ख्रिसमस आणि न्यू ईयरच्या सेलिब्रेशनला ब्रेक?; मुंबई महापालिका जारी करणार नवी नियमावली
Follow us on

मुंबई: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा पहिल्यांदाच ख्रिसमस आणि न्यू ईयरच्या सेलिब्रेशनला ब्रेक लागण्याची शक्यता आहे. मुंबईकरांनी गर्दी करू नये आणि कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून मुंबई महापालिका यानिमित्ताने येत्या 20 डिसेंबर रोजी नवी नियमावली जाहीर करणार आहे. त्यामुळे ख्रिसमस आणि न्यू ईयर निमित्ताने होणाऱ्या सार्वजनिक आणि सामुदायिक जल्लोषाला यंदा प्रथमच ब्रेक लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (bmc will issue new guidelines for new year celebrations)

मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी हा बाबतची माहिती दिली. न्यू ईयर आणि ख्रिसमसच्या सेलिब्रेशनच्या पार्श्वभूमीवर नवी नियमावली जारी करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वांना एकत्र येऊन सेलिब्रेशन करता येणार नाही. येत्या 20 डिसेंबर रोजी ही नियमावली जाहीर करण्यात येणार असल्याचं काकाणी यांनी सांगितलं.

चौपाट्यांवर एकत्र येण्यास मज्जाव?

दिवाळीप्रमाणे ख्रिसमस आणि न्यू ईयरला मरीन ड्राईव्ह, वरळी सी-फेससह मुंबईतील इतर चौपाट्यांवर एकत्र येऊन जल्लोष करण्यास मनाई करण्यात येणार आहे. चौपाट्यांवर हजारोंचा जमाव जमू नये म्हणून मुंबई महापालिकेने या हालचाली सुरू केल्याचं सूत्रांनी सांगितलं. तसेच नाईट क्लब आणि हॉटेल्ससाठीही कडक नियम लागू करण्यात येणार आहे. एवढेच नव्हे तर हॉटेलमधील स्टाफसाठीही नियमावली लागू करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितलं. महापालिकेने गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील नाईट क्लब आणि हॉटेल्सवर धाड घालण्यास सुरुवात केली असून नाईट क्लबमध्ये मास्क न लावता हजारो लोक एकत्र येत असल्याचं आढळून येत आहे. त्या पार्श्वभूमीवर न्यू ईयर आणि ख्रिसमसच्या दिवशीही हजारो लोकांनी एकत्र येऊ नये म्हणून महापालिकेकडून खबरदारी घेतली जात आहे. नागरिकांच्या स्वभावात बदल व्हावा म्हणून नाईट क्लबवर कारवाई करण्यात येत असल्याचं काकाणी यांनी सांगितलं. तसेच कोरोना असो वा नसो मास्क घालणं बंधनकारकच असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

लोकलचा निर्णय डिसेंबर अखेरीस

मुंबईकरांसाठी लोकल सुरू करायची की नाही या बाबतचा आढावा डिसेंबर अखेरीस घेण्यात येईल. त्यानंतर निर्णय घेण्यात येणार असल्याचं ते म्हणाले. मुंबईत सध्या कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याचंही ते म्हणाले. (bmc will issue new guidelines for new year celebrations)

 

संबंधित बातम्या:

मुंबईकरांसाठी मोठी बातमी! नवीन वर्षात लोकल सुरु करता येणार, वडेट्टीवारांना विश्वास

राज्यातील तीन मोठी शहरं, पाच महत्वाच्या बातम्या

कांजूरमार्ग मेट्रो कारशेडच्या जागेवरुन राज्य सरकार अडचणीत; न्यायालयाची जिल्हाधिकाऱ्यांना तंबी

(bmc will issue new guidelines for new year celebrations)