LIVE | नाशिकमध्ये आज 167 जण कोरोनामुक्त, नव्या 167 बाधितांची नोंद

| Updated on: Mar 13, 2021 | 12:10 AM

LIVE : आज राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे लाईव्ह अपडेट्स | Live Updates

LIVE | नाशिकमध्ये आज 167 जण कोरोनामुक्त, नव्या 167 बाधितांची नोंद
Breaking news
Follow us on

LIVE : आज राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे लाईव्ह अपडेट्स

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 14 Feb 2021 11:44 PM (IST)

    नाशिकमध्ये आज 167 जण कोरोनामुक्त, नव्या 167 बाधितांची नोंद

    नाशिकमध्ये आज 167 जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. दुसऱ्या बाजूला नव्या 167 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

  • 14 Feb 2021 11:22 PM (IST)

    इचलकरंजी पिसाळलेल्या कुत्र्यांचा उच्छाद, 12 जणांचा घेतला चावा 

    कोल्हापूर : गुरुकन्नन नगर पिसरात पिसाळलेल्या कुत्र्यांचा उच्छाद

    लहान मुलांसह सुमारे 10 ते 12 जणांचा कुत्र्यांनी घेतला चावा

    आयजीएम हॉस्पिटलमध्ये रेबीजची लस नसल्याने रुग्णांची हेळसांड

    नगरपालिका व आरोग्य प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष


  • 14 Feb 2021 10:22 PM (IST)

    नाशिक जिल्ह्यात दिवसभरात 167 नवे कोरोनाग्रस्त, एकूण 2071 जणांचा मृत्यू

    नाशिकमध्ये दिवसभरात नव्या 167 कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे.

    महानगरपालिका क्षेत्रात एकूण 115 नवे कारोना रुग्ण आढळले आहेत.

    तर नाशिक ग्रामीण भागात नवे 45 कोरोना रुग्ण सापडले आहेत.

    नाशिकमध्ये आतापर्यंत 2071 जणांचा मृत्यू झाला आहे.

  • 14 Feb 2021 07:46 PM (IST)

    पालघर-मनोर रस्त्यावर भीषण अपघात, 12 मजूर गंभीर जखमी

    पालघर-मनोर रस्त्यावर भीषण अपघात, 12 मजूर गंभीर जखमी

    चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात

    विनोद कुकवेयर कंपनि जवळ घडला अपघात

    जीपमधील 10 ते 12 मजूर गंभीर जखमी

    अर्ध्यातासापासून वाहतूक कोंडी

    जीप पालघरहून चाहडे नाका येथे जाताना अपघात

  • 14 Feb 2021 07:33 PM (IST)

    अमरावती जिल्हात कोरोनाचा कहर सुरूच, 399 नवे कोरोना रुग्ण

    अमरावती : अमरावतीमध्ये कोरोना कहर सुरुच, दिवसभरात 399 नवे कोरोना रुग्ण

    -तीन कोरोना रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू

    -जिल्हात आतापर्यंत  25294 कोरोना बाधित रुग्ण

    -आतापर्यंत  23754 रुग्णांनी केली कोरोनावर मात

    -आतापर्यंत 435 कोरोना रुग्णांचा मृत्यू

    -आज 374 रुग्णांनी केली कोरोनावर मात

  • 14 Feb 2021 06:39 PM (IST)

    वाशिममध्ये कोरोना रुग्णांत वाढ, दिवसभरात पुन्हा 44 नवे रुग्ण

    वाशिम : जिल्ह्यात आज पुन्हा आढळले 44 नवे कोरोना रुग्ण

    दिवसभरात कोरोनामुक्त झाले 20 रुग्ण

    जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 7334 कोरोना रुग्ण

    जिल्ह्यात सध्या 127 अ‌ॅक्टिव्ह कोरोना रुग्ण

  • 14 Feb 2021 05:49 PM (IST)

    विद्रोही साहित्य संमेलन 25 आणि 26 मार्चला होणार

    – 15 वे मराठी विद्रोही साहित्य संमेलनाच्या तारखा जाहीर

    – 25 आणि 26 मार्चला नाशिकमध्ये पार पडणार संमेलन, ठिकाण अद्याप निश्चित नाही

    – अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावर बहिष्कार टाकून हे संमेलन भरवणार

    – कायदेशीर सल्ला घेऊन ग्रेटा थनबर्गच उदघाटनाला येईल यासाठी प्रयत्न सुरु

    – विद्रोही साहित्य सांस्कृतिक मंडळाच्या अध्यक्षा प्रतिमा परदेशी यांची माहिती

  • 14 Feb 2021 05:48 PM (IST)

    पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची चौकशी करा, अन्यथा मोठं आंदोलन करू : चंद्रशेखर बावनकुळे

    यवतमाळ : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी प्रेस रिलीज दिली नाही, पोलीस प्रकरणावर बोलत का नाही

    एक कॅबिनेट मंत्री इतके दिवस पुढे येत नाही त्याची माहिती सरकारला का नाही ?

    2 फेब्रुवारीला ही मुलगी यवतमाळमध्ये होती अशी माहिती पुढे येत आहे.

    एक मंत्री पुरावे नष्ट करा असे सांगत असल्याचं ऑडिओ क्लिपमध्ये दिसते

    यापेक्षा पोलिसांना काय पुरावे पाहिजे

    हे सरकार मंत्र्याच्या पाठीशी उभे असल्याचं दिसून येतं. सरकार मंत्र्याला वाचविण्याचा प्रयत्न करत आहे.

    चूक नसेल तर मंत्र्याने समोर यायला पाहिजे

    जे सुरू आहे ते योग्य नाही , या प्रकरणाची लवकर चौकशी केली पाहिजे

    महिला आयोगाने प्रकरणाची दखल घेतली आहे

    जनते समोर योग्य माहिती आली नाही तर आम्ही यवतमाळ मध्ये मोठं आंदोलन करू

  • 14 Feb 2021 05:25 PM (IST)

    शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांची पत्रकार परिषद लाईव्ह

    पूजा चव्हाण प्रकरणात जी काही वस्तुस्थिती आहे. त्या दृष्टीने काम करणे सुरु आहे. त्यामुळे आधीच निष्कर्षापर्यंत येणं चुकीचं आहे.

    उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असल्यामुळे योग्य न्याय दिला जाणार

    काय वस्तुस्थिती बघूनच काय तो निर्णय घेतला जाईल.

    वस्तुस्थिती तपसली जाईल. कायदेशीर चौकटमधूनच न्याय दिला जाईल.

    लीक होणाऱ्या माहितीचा उपयोग करुन कायद्याला किचकट करु नका

    टीआरपी वाढते म्हणून बातम्या दाखवल्या जातात. मात्र, त्यामुळे आपला संवेदनहीनतेकडे प्रवास सुरु आहे.

    या प्रकरणात सरकारची सजाबाबदरी वाढते आहे.

    बदनामी करण्यासाठी राजकारण नको.

    लीक होणाऱ्या माहितीच्या आधारे बातमी देताना काळजी घ्या.याआधीच्या प्रकरणात अशाच लीक माहितीवर बातम्या दिल्या गेल्याने प्रकरणाला वेगळे वळण लागतं.

    समाजामध्ये बेकायदशीर शस्त्रे वाढत जात आहेत.

    – पूजा चव्हाण प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकर यांनी यासंदर्भात स्पष्ट केलंय, ह्या प्रकरणाचा सखोल तपास केला जाईल. तपासात जे पुढं येईल त्याप्रमाणे कारवाई होईल. पुणे पोलिसांनी तशा सूचना देण्यात आल्यात.

    -पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी शवविच्छेदन अहवाल अजून यायचा आहे. ज्या क्लिप व्हायरल झाल्या आहेत त्याचं व्हॉइस सॅम्पल पहावं लागणार आहेत. त्या दृष्टीने तपास होईल.

    – ह्या प्रकरणी कोणत्या पक्षाचा असा हा विषय नाही. पूर्ण तपास होईपर्यंत निष्कर्ष काढणं योग्य नाही.

    – त्यांना मंत्री पदापासून दूर करायचं का नाही हा निर्णय तिन्ही पक्ष मिळून घेतील.

     

  • 14 Feb 2021 04:41 PM (IST)

    चंद्रकांत पाटील यांची पत्रकार परिषद LIVE

    पूजा चव्हाण प्रकरणातील लॅपटॉप कुठे आहे?

    मी  धनंजय मुंडे यांना मी घाबरत नाही. त्यांचं नाव आजही घेतलं.

  • 14 Feb 2021 04:37 PM (IST)

    नाशिकमध्ये दीड वर्षाच्या मुलीचे अपहरण, अजूनही शोध नाही

    नाशिक : 24 तास उलटूनही चिमुरडीचा शोध नाही

    नाशिक पोलिसाकूडन चौकशी सुरु आहे.

    जिल्हा रुग्णालयातील सीसीटीव्हीमध्ये एक इसम मुलीला घेउन जात असल्याचं कैद झालं आहे.

    पोलीस पथक आहेत या संशयिताच्या मागावर आहेत.

    लहान मुलं किडनॅपिंगच रॅकेट सक्रिय नाही ना ? असा प्रश्न अपस्थित

  • 14 Feb 2021 04:34 PM (IST)

    नाचता येईना अंगण वाकडे अशी सरकारची, चंद्रकांत पाटील यांची घणाघाती टीका

    सांगली : नाचता येईना अंगण वाकडे अशी राज्य सरकारची अवस्था – चंद्रकांत पाटील

    केंद्राने भरपूर दिलं, एक रुपयांच पॅकेज ही यांनी दिलं नाही

    उद्धवजी आता शेतकऱ्याच्या हक्काचं देत नाहीत

    महाराष्ट्रातील जीएसटीचे पैसे मिळतात. मात्र ते बंगले दुरुस्ती, गाड्या खरेदीसाठीवापरले

  • 14 Feb 2021 03:50 PM (IST)

    मराठा विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरुन छावा संघटना आक्रमक, कार्यकर्ते सोमवारी मंत्रालयात विष प्राशन करणार

    आजाद मैदानात बसलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या विद्यार्थ्यांना शासकीय सेवेत समाविष्ट करून घ्यावं. याबाबत वारंवार राज्यसरकारकडे मागणी करून तसेच राज्य सरकारशी पत्रव्यवहार करूनही कुठल्या प्रकारची दाद न दिल्यामुळे छावा संघटना आक्रमक झाली आहे. या संघटनेचे कार्यकर्ते उद्या सोमवारी मंत्रालयात बसून विषप्राशन करणार आहेत. तसा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे.

  • 14 Feb 2021 03:41 PM (IST)

    पूजा चव्हाणच्या आत्महत्येची चौकशी झाली पाहिजे, पूजाच्या आजोबांची मागणी

    बीड; पूजा चव्हाणच्या आत्महत्येची चौकशी झाली पाहिजे

    पूजाच्या आजोबांची मागणी

    वसंतनगर येथील आजोबा नारायण राठोड यांची मागणी

    शासनाने सीआयडी सारख्या यंत्रणेकडून चौकशी झाली पाहिजे

    पूजाच्या आजोबांची मागणी

  • 14 Feb 2021 01:23 PM (IST)

    गोवा सरकारचे विमान नाही हे संजय राऊत यांना चांगलं माहिती आहे, गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर

    राज्यपालांना विमान प्रवास नाकारल्याचं प्रकरण.

    संजय राऊत यांना गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचं चोख उत्तर.

    भगतसिंह कोश्यारी हे गोव्याचेही राज्यापाल आहेत. त्यामुळे त्यांनी अधूनमधून गोवा सरकारचेही विमान वापरावे, थोडा भार त्यांच्यावरही टाकावा असं संजय राऊत म्हणाले होते.

    गोवा सरकारचे विमान नाही हे संजय राऊत यांना चांगलं माहीत.

    गोव्याकडे विमान असते तर ते राज्यपालांचेच असले असते.
    कारण ते शेवटी राज्यपाल आहेत.

    माञ महाराष्ट्रत जो प्रकार घडला त्याबद्दल न बोललेलंच बरं.

    अशा शब्दात गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांचा घेतला समाचार

  • 14 Feb 2021 01:06 PM (IST)

    पूजाला न्याय मिळाला पाहिजे, जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल : रोहित पवार

    -पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात जो जबाबदार असणार त्यावर कारवाई होणार

    – मात्र त्याची चौकशी झाली पाहिजे त्यानंतरच कारवाई करता येणार,त्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे

    – गोगाई यांचे विधान भीतीदायक आहे, माजी न्यायमूर्तीनी असं विधान करणं म्हणजे सर्वसामान्यांसाठी खेदजनक आहे

  • 14 Feb 2021 12:59 PM (IST)

    राज्यपालांचं आणि सरकारचं आता खुलं युद्ध

    राज्यपालांचं आणि सरकारचं आता खुल युद्ध

    राज्यपालांच्या आडून भाजप युद्ध खेळत आहे

    मंत्रिमंडळाच्या शिफारसी राज्यपालांना स्वीकारणं बंधनकारक असं कायदा सांगतो

    मात्र कित्येक महिने उलटून गेले तरी राज्यपाल प्रस्तावावार सही करत नाही, राज्यपालांवर कुणाचा दबाव

    6 वर्ष ज्या आमदारांचं नुकसान होणार त्याच काय?

  • 14 Feb 2021 12:00 PM (IST)

    पोलीस दबावात काम करत नाहीत, थोरातांचं फडणवीसांना उत्तर

    पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात मुख्यंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे चौकशी होईल आणि चौकशी अंती सत्य बाहेर येईल

    पोलीस दबावात काम करतात, हा आरोप खोटा, पोलिस दबावात काम वगैरे करत नाही. ते त्यांचं काम करत आहेत..

    बाळासाहेब थोरात ऑन कोरोना

    – राज्यात कोरेना वाढतोय ही काळजीची बाब आहे

    – रुग्ण कमी झाल्यामुळे लोक बिनधास्त झाले होते

    – कोरोना रुग्ण वाढत असल्याने काही बंधने घालण्यात येतील का? याबाबत उद्या – परवा दोन दिवसांत मुख्यमंत्री निर्णय घेतील…

  • 14 Feb 2021 11:44 AM (IST)

    फास्ट टॅगला मुदतवाढ नाही, नॅशनल हायवेवरील टोल नाक्यावर उद्यापासून फास्ट टॅग बंधनकारक :

    नॅशनल हायवेवरील टोल नाक्यावर उद्यापासून फास्ट टॅग बंधनकारक

    – आता फास्ट टॅगला मुदतवाढ मिळणार नाही

    – राष्ट्रीय महामार्गावरील टोलवर आता फास्ट टॅग बंधनकारक

    – टोल नाक्यावर वाहनांची गर्दी होऊ नये म्हणून फास्ट टॅग लावणे गरजेचं

    – १५ फेब्रुवारी ही शेवटची तारीख आहे, त्यानंतर मुदतवाढ नाही

    – बऱ्याच महामार्गावर ९० टक्के वाहनांनी फास्ट टॅग लावलाय

    – केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची माहिती

  • 14 Feb 2021 11:15 AM (IST)

    पोलिस दबावाखाली काम करत आहेत : फडणवीस

    जेवढ्या गंभीरतेने कारवाई केली पाहिजे तेवढ्या गंभीरतेने पोलिस कारवाई होत नाही
    क्लिप्सच्या आधारावर पोलिसांनी सुमोटो कारवाई केली पाहिजे
    पण पोलिस दबावाखाली असल्याचं दिसून येतंय

    पोलिसांनी पहिल्यांदा गुन्हा दाखल करावा.. सत्य लोकांसमोर आलं पाहिजे
    मुख्यमंत्र्यांनी हे प्रकरण किती गांभीर्याने घेतलंय, हे मला माहिती नाही …

    मुख्यमंत्र्यानी त्या क्लिप नीट ऐकाव्यात म्हणजे त्यांना कळेल की कुणाचं आयुष्य उध्वस्त झालंय…

    आमचे राज्याचे नेते कुठुनही निवडून येऊ शकतात, हे महत्त्वाचं, फडणवीसांचा शरद पवारांना टोला

  • 14 Feb 2021 10:14 AM (IST)

    औरंगाबादेत 10 ठिकाणी उभारणार चार्जिंग स्टेशन, महापालिकेचा टाटा पॉवर कंपनीशी करार

    औरंगाबादेत 10 ठिकाणी उभारणार चार्जिंग स्टेशन

    इलेक्ट्रिक वाहनांना प्रोहोत्सन देण्यासाठी शहसनाचा उपक्रम

    चार्जिंग स्टेशनसाठी टाटा पॉवर कंपनीशी महापालिकेचा करार

    इलेक्टरिक वाहनांसाठी औरंगाबादेत मोठी संधी

    इलेक्ट्रिक वाहन वापरणाऱ्यांची होणार मोठी सोय

  • 14 Feb 2021 10:13 AM (IST)

    पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण गंभीर, पोलिसांनी कसून तपास करावा- आठवले

    मूळची परळीची असलेली पुणे स्थित तरुणी पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येने राज्यात खळबळ माजली आहे. राज्य सरकारमधील एका बड्या मंत्र्याच्या भोवती संशयाची सुई आहे, असा आरोप भाजपने केला आहे. यावर बोलताना रामदास आठवले म्हणाले, “पुण्यातील पूजा चव्हाण प्रकरण गंभीर आहे. या प्रकरणाची शहानिशा झाली पाहिजे. पुणे पोलिसांनी चौकशी करावी”

  • 14 Feb 2021 08:28 AM (IST)

    नागपूरकरांसाठी आनंदाची बातमी, यंदाच्या उन्हाळ्यात पाणीकपात नाही

    – नागपूरकरांसाठी आनंदाची बातमी

    – यंदाच्या उन्हाळ्यात नागपूरात पाणीकपात नाही

    – नागपूरला पाणीपुरवठा करणाऱ्या पेंच प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा

    – पेंच धरणात सध्या ७८ टक्के पाणीसाठा

    – पुरेशा पाणीसाठ्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात पाणीकपात नाही

    – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या OCW ची माहिती

  • 14 Feb 2021 08:13 AM (IST)

    पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण तडीस लागेपर्यंत तपास करणार

    -पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण तडीस लागेपर्यंत तपास करणार आहोत,

    – पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर पुणे पोलिसांचा दावा,

    – याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात कायदेशीर अडचणी असल्यानेच गुन्हा नोंद केला नसल्याचेही पोलिसांचे स्पष्टीकरण,

    – पूजाने महाविकास आघाडीतल्या एका मंत्र्यांच्या दबावातून आत्महत्या केली असल्याचा आरोप भाजप नेत्यांकडून केला जातोय.

  • 14 Feb 2021 08:04 AM (IST)

    गोकुळ निवडणुकीचे पडघम अखेर वाजले

    गोकुळ निवडणुकीचे पडघम अखेर वाजले

    निवडणुकीसाठीची प्रारुप मतदार यादी उद्या जाहीर होणार

    12 एप्रिलला होणार अंतिम मतदार यादी प्रसिद्ध

    मतदान प्रक्रिया एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होण्याची शक्यता

    निवडणुकीसाठी आतापर्यंत दाखल झालेत 3 हजार 764 संस्थांचे ठराव

    निवडणूक प्रक्रियेला वेग आल्यान गोकुळ च्या राजकारणा ला येणार उकळी

    सत्ताधाऱ्यां समोर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील गटाचं तगड आव्हान

  • 14 Feb 2021 08:00 AM (IST)

    पुणे जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा धोका

    पुणे जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा धोका वाढतोय,

    – शहरात सुमारे महिनाभराच्या खंडानंतर काल पुन्हा एकदा एकाच दिवसांत तीनशेहून अधिक नवे कोरोना रुग्ण आढळून आलेत,

    – शिवाय मागील आठवडाभरापासून दररोज सातत्याने नव्या रुग्णांत वाढ होतेय

    – जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून दररोज प्रसिद्ध अहवालातून स्पष्ट

    – काल पुणे शहरात दिवसभरात 331 तर जिल्ह्यात मिळून 612 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेत

    – पुणे शहरात याआधी 20 जानेवारीला एकाच दिवसात 310 नवे रुग्ण सापडले होते

    – त्यानंतर तब्बल 25 दिवस शहरातील दिवसभरातील नवीन कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने 250 पेक्षाही कमी असे…

  • 14 Feb 2021 07:59 AM (IST)

    नागपुरात कोरोनाचा ब्लास्ट, प्रशासन अलर्ट मोडवर

    नागपूर जिल्ह्यात कोरोना रुग्णवाढ कायम

    – जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ४८६ नव्या कोरोना रुग्णांची नोंद

    – कोरोना रुग्णवाढीमुळे मनपा प्रशासन ॲक्शन मोडमध्ये

    – मंगल कार्यालय, लॅानमधील लग्न समारंभावर मनपाचा वॅाच

    – जास्त गर्दी असल्यास मंगल कार्यालय, लॅान सील करणार

    – मनपा आयुक्त राधाकृष्ण बी यांचा इशारा

    – इमारतीत कोरोना रुग्ण आढळल्यास, सर्वांना चाचणी करणे अनिवार्य

  • 14 Feb 2021 07:56 AM (IST)

    पुरंदरच्या नियोजित विमानतळावरून वाद रंगला, विजय शिवतारेंचं शरद पवारांना पत्र

    -पुरंदरच्या नियोजित विमानतळावरून वाद रंगला

    – शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे यांचे शरद पवारांना पत्र,

    – विमानतळाची जागा बदलण्यास आपला विरोध असल्याची शिवतारे यांची भूमिका,

    – पारगाव वगळून विमानतळ अगोदरच्या नियोजित जागेवरच करण्याची पत्राद्वारे केली मागणी,

    – विमानतळ बाधितांना द्यावयाचा मोबदला तत्काळ जाहीर करा,

    – मोबदला पाहून शेतकरी आपला निर्णय घेतील अशी मागणी माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केली आहे.

    – राजुरी, रीसे, पिसे, मावडी, पिंपरी, पांडेश्वर, नायगाव या नवीन गावात विमानतळ केल्यास त्याचा पुरंदरच्या विकासाला फायदा होणार नाही,

    – जागा बदलास आपला विरोध असल्याचे शिवतारे यांनी पत्रात म्हटलंय.

  • 14 Feb 2021 07:45 AM (IST)

    तेलंगणाच्या भाविकांना उस्मानाबादमध्ये लुटलं

    उस्मानाबाद : तेलगणा येथील भाविकांना दरोडेखोरांनी लुटले

    उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी येथील इंदापूर कारखाना जवळील घटना

    2 पुरुष व 3 महिलांना जबर मारहाण करून केले जखमी

    8 तोळे दागिन्यांसह रोख रक्कम लुटली

    खिळे ठोकलेला रॉड गाडी समोर फेकून गाडी TS 34 A 3768 अडवून लुटली

    जखमींवर उस्मानाबाद शासकीय रुग्णालयात उपचार सुरू..

    हे भाविक तेलंगणा येथून शिर्डीला साईबाबा दर्शनासाठी जात होते..

  • 14 Feb 2021 07:44 AM (IST)

    क्रेडिट कार्डचं लिमिट वाढवतो सांगून नाशिकमध्ये एका व्यक्तीला 80 हजारांचा गंडा

    -क्रेडिट कार्डचे लिमिट वाढवण्याच सांगता एकाला नाशिकमध्ये 80 हजारांना घातला गंडा
    – आर.बी एल बँकेतून बोलत असल्याचं सांगत संदीप कहरे यांना घातला गंडा
    – सरकारवाडा पोलीस ठाण्यात संशयित भामट्या विरोधात गुन्हा दाखल
    – अनोळखी फोन कॉल्स आल्यास खातरजमा केल्या शिवाय आपली बँक डिटेल्स कोणाला ही देऊ नका नाशिक सायबर पोलिसांचं आवाहन

  • 14 Feb 2021 07:41 AM (IST)

    कोल्हापुरात 60 एकर उसाला शॉर्टसर्किटमुळे आग

    कोल्हापुरात 60 एकर मधील उसाला शॉर्टसर्किटमुळे आग

    सुमारे आठशे टन ऊस जळून खाक

    आजरा तालुक्यातील भादवण येथील घटना

    50 शेतकऱ्यांचं जवळपास 25 लाखांचं नुकसान

    गावच्या यात्रे दिवशीच घडली दुर्घटना

  • 14 Feb 2021 07:39 AM (IST)

    नागपुरात बजरंग दलाकडून व्हॅलेंटाईन डे चा विरोध

    -नागपुरात बजरंग दलाकडून व्हॅलेंटाईन डे चा विरोध

    – संविधान चौकात घोषणाबाजी करत केला विरोध

    – ‘विदेशी संस्कृतीशी जुडू नका, व्हॅलेंटाईन डे चा विरोध करा’

    – बजरंग दलच्या पदाधिकाऱ्यांनी केलं तरुणांना आवाहन

    – आजचा दिवस मातृ पितृ दिवस साजरा करण्याचंही केलं आवाहन

    – बजरंग दलाकडून दरवर्षी होतोय व्हॅलेंटाईन डे चा विरोध

  • 14 Feb 2021 06:59 AM (IST)

    मिटकरींकडून पडळकरांना चोराची उपमा

    चोरासारखे येऊन उदघाटन करणाऱ्याना मर्दांनगी म्हणत नाहीत. पडळकरांचा आवाका किती आहे हे मला चांगलं ठाऊक आहे . लावारीस पिलावळ आम्हाला विरोध करीत राहणार हे आम्हाला माहिती आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया आमदार मिटकरी यांनी दिली आहे. ते लातुर जिल्ह्यातल्या उदगीर इथं माध्यमांशी बोलत होते.

  • 14 Feb 2021 06:55 AM (IST)

    … तर 90 टक्के कामगार कायदे मोडित निघतील, जयंत पाटील यांनी बोलून दाखवली भीती

    देशात 2024 ला पुन्हा भारतीय जनता पार्टीची सत्ता आली तर 90 टक्के कामगार कायदे मोडीत निघतील, अशी भीती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बोलून दाखवली आहे. ते मुक्ताईनगरमध्ये बोलत होते.

  • 14 Feb 2021 06:22 AM (IST)

    एकनाथ खडसेंचा करिश्मा, भाजपच्या 18 विद्यमान नगरसेवक आणि 13 माजी नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

    राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला मोठा धक्का दिला आहे. भुसावळमधील 18 नगरसेवकांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. भुसावळमधील 18 विद्यमान नगरसेवक आणि 13 माजी नगरसेवक तसंच त्यांच्या कुटुंबीयांनी जळगावात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीत प्रवेश केला.