यामुळे घोडबंदर रोडची सुटली वाहतूक कोंडी; येथील प्रवाशांचा प्रवास होणार सुखकर

| Updated on: Mar 28, 2023 | 4:15 PM

पुलाचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जानेवारी 2018 मध्ये भूमिपूजन केले होते. मात्र त्यानंतर कोरोनाची जागतिक महामारी आली. त्यामुळे पुलाचे काम थांबले होते. मात्र कोरोना संपताच पुलाच्या कामाला गती मिळाली.

यामुळे घोडबंदर रोडची सुटली वाहतूक कोंडी; येथील प्रवाशांचा प्रवास होणार सुखकर
Follow us on

पालघर : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग हा गुजरात आणि मुंबईला जोडणारा एकमेव महामार्ग आहे. मात्र मुंबईच्या बाहेर निघताना आणि गुजरातवून मुंबईच्या प्रवेशावर घोडबंदर वर्षोवा येथील वाहतूक कोंडी ही नित्याची झाली होती. तासंतास वाहतूक कोंडीत अडकून वाहनधारक हैराण होते. घोडबंदरजवळील वर्सोवा पुलाचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जानेवारी 2018 मध्ये भूमिपूजन केले होते. मात्र त्यानंतर कोरोनाची जागतिक महामारी आली. त्यामुळे पुलाचे काम थांबले होते. मात्र कोरोना संपताच पुलाच्या कामाला गती मिळाली.

नितीन गडकरी यांचे ट्वीट आणि…

पण काल 27 मार्च रोजी कोणताही गाजावाजा न करता केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी एक ट्वीट केले. त्यानंतर अवघ्या 3 तासात रात्री 7 नंतर नवा वर्सोवा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. त्यामुळे वाहनधारकांना मोठा दिलासा दिला आहे. आता मुंबई, ठाणे, पालघर, गुजरात, सुरत या वाहनधारकांचा प्रवास सुखकर होणार आहे.

हे सुद्धा वाचा

तेव्हापासून पूल अनेकवेळा बंद

मुंबई आणि अहमदाबादला जोडण्यासाठी घोडबंदर वर्सोवा खाडीवर पहिला वर्सोवा पूल 1970 मध्ये बांधण्यात आला होता. त्यानंतर दुसरा पूल 2000 मध्ये बांधण्यात आला आहे. दुसरा मुंबई गुजरात एका मार्गिकेचा तिसरा पूल हा 27 मार्च 2023 ला वाहनधारकासाठी खुला झाला आहे. पण राज्यात जुने पूल तुटल्याच्या घटना समोर आल्या. त्यानंतर वर्सोवा जुन्या पुलाचे ही स्टकचरल ऑडिट करण्यात आले. तो नादुरुस्त असल्याचे समोर आले. तेव्हापासून दुरुस्तीच्या कामासाठी वर्सोवा जुना पूल अनेकवेळा बंद करण्यात आला.

नव्या वर्सोवा पुलाला मिळाली मंजुरी

मुंबई आणि गुजरातच्या दोन्ही लेनवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली. तासंतास वाहनधारकांनी वाहतूक कोंडीत काढले. आजूबाजूच्या व्यावसायिक, स्थानिक रहिवासी यांनाही फटका बसला. याचाच पर्याय म्हणून नव्या वर्सोवा पुलाला मंजुरी मिळाली. यात अनेक अडचणी आल्या. पण सर्व अडचणींवर मात करून नवा वर्सोवा पूल चालू झाल्याने सर्वांनीच समाधान व्यक्त केले आहे.

नव्या पुलाची कशी असेल दिशा

मुंबईहून पालघर, गुजरात, सुरत, अहमदाबाद जाण्यासाठी नव्या वर्षोवा पुलाचा वापर करायचा आहे. मुंबई दहिसर टोल नाक्यामार्गे, ठाणे, नाशिक, भिवंडी, नवी मुंबई जाण्यासाठी, नव्या पुलाच्या सुरवातीलाच डाव्या बाजूने वळून, पुलाखालून ठाण्याच्या दिशेला जायचे आहे.

ठाण्याहून घोडबंदरमार्गे आले तर मीरा रोड, भाईंदर, दहिसर, बोरिवली, अंधेरी, मुंबई जाण्यासाठी सरळ नव्या पुला जवळून खालूनच डाव्या बाजूने जायचे आहे. ठाण्याहून अहमदाबाद, गुजरात, सुरत, पालघर, जायचे असेल तर सरळ पुला खालून वळसा घालून नव्या पुलावरून जायचे आहे.

स्थानिकांची मोठी मदत

स्थानिक भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष सुशांत पाटील म्हणाले, राज्यात पुल आणि पडझडीच्या घटना घडल्या. त्यानंतर स्ट्रक्टरल ऑडिटचा विषय समोर आला. तेव्हा वर्सोवा जुन्या ब्रिजचंही स्ट्रक्टरल ऑडिट करण्यात आलं होतं. त्यामध्ये हा पूल कमकुवत असल्याचं समोर आलं. त्यानंतर अनेकवेळा हा पूल बंद झाला. त्यामुळे वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. त्यातून हा प्रस्ताव समोर आला. त्यानंतर झपाट्यानं या कामाला सुरुवात झाली. हे काम पूर्ण करून घेण्यासाठी स्थानिकांची मोठी मदत झाली.