देशातील सर्वात मोठ्या औद्योगिक घरण्यातील चेअरमन रतन टाटा यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्यावर गुरुवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे. महाराष्ट्रात आणि झारखंडमध्ये एका दिवसाचा शासकीय दुखावटा जाहीर केला. त्याचवेळी शेअर बाजारानेही रतन टाटा यांना अनोखी श्रद्धांजली अर्पण केली. गुरुवारी टाटा ग्रुपच्या शेअरमध्ये 15 टक्के वाढ झाली.
रतन टाटा 1991 ते 2012 दरम्यान टाटा ग्रुपचे चेअरमन होते. मीठापासून सॉफ्टवेअरपर्यंत टाटा ग्रुपच्या दोन डझनपेक्षा जास्त कंपन्या शेअर बाजारात लिस्टेड आहेत. टीसीएस ही देशातील दुसऱ्या क्रमांकाची व्हॅल्यूबल कंपनी आहे. ही कंपनी 2004 मध्ये भारतीय शेअर बाजारात लिस्ट झाली होती. आता तिचे मार्केट कॅपिटल 15,43,114.33 कोटी आहे. ग्रुपच्या इतर कंपन्यांमध्ये टाटा मोटर्स, टायटन, टाटा स्टील, ट्रेंट, टाटा पॉवर, टाटा कंज्यूमर प्रॉडक्ट्स, इंडियन हॉटल्स, टाटा कम्युनिकेशंस, व्होल्टास आणि टाटा एलेक्सीचा समावेश आहे. यामधील अनेक कंपन्यांचे शेअर गुरुवारी वधारले होते.
टीसीएसच्या शेअर बाजारात 0.22% टक्के वाढ झाली. टीसीएसचे शेअर 4261.50 रुपयांवर पोहचले. टीसीएसचा 52 आठवड्यातील उच्चांक 4,585.90 रुपये आहे. टाटा मोटर्सचे शेअरमध्ये मात्र 0.35% घसरण होती. हे शेअर 935.85 रुपयांवर होते. टायटनचे शेअर 3494.00 रुपयांवर आहे. टाटा स्टीलचे शेअरमध्ये 1.01% वाढ होती. हे शेअर 160.60 रुपयांवर आहे.
टाटा ग्रुपची रिटेल कंपनी ट्रेंटच्या शेअरमध्ये 1.75% घसरण होती. त्या कंपनीचे शेअर 8076.25 रुपयांवर ट्रेड करत होते. रतन टाटा यांचे बंधू नोयल टाटा या कंपनीचे चेअमरन आहे. टाटा पॉवरचे शेअर 2.36% वाढीसह 471.80 रुपयांवर ट्रेड करत होते. टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जी मोठी योजना बनवण्याच्या तयारीत आहे. एका रिपोर्टनुसार, पुढील सहा वर्षांत कंपनी 75,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना तयार केली आहे.